IMPIMP

Pune Crime | पुण्यातील कृषी आयुक्तालयातील महिला अधिकाऱ्याचा शिपायाकडून ‘मिठी’ मारत विनयभंग

by nagesh
Pune Crime Female officer of Agriculture Commissionerate in Pune molested by hug

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयातील (State Agriculture Commissioner office) शिपायाने महिला अधिकाऱ्याला मिठी मारत विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) आरोपी शिपायाविरुद्ध आयपीसी 354, 354 (ड) अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिला अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार (Pune Crime) शुक्रवारी (दि.26) दुपारी साडेबाराच्या सुमारास कृषी आयुक्त कार्यालयात घडला.

 

स्वप्नील भोसले Swapnil Bhosale (रा. मेंटल कॉर्नर, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या कृषी आयुक्त कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आरोपी त्याच कार्यालयात शिपाई म्हणून काम करतो. आरोपीने कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर त्याच्या रजेचा टाईप केलेला अर्ज लावला. त्या अर्जावर फिर्यादी यांचे इंग्रजीत नाव लिहिले.

 

याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी या कार्यालयातील जेन्टस टिफीन येथे जाऊन जाब विचारला.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांचा उजवा हात पकडला व मिठी मारत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | Female officer of Agriculture Commissionerate in Pune molested by hug

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts