IMPIMP

Pune Crime | 84 लाख रूपयांच्या फसवणूकप्रकरणी ओसवाल पती-पत्नीविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime | 66-year-old sister lodges complaint against 70 year old brother in Pune; Know the case of Wanwadi

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  Pune Crime | व्यवसायासाठी मित्राकडून घेतलेले 84 लाख रुपये परत न करता फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth police station) दोघांवर फसवणूकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी मर्सिडीज गाडी (Mercedes car) देण्याच्या बहाण्याने 10 लाख रुपये घेऊन गाडी न देता फसवणूक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रोनक दिलीप ओसवाल (वय-29) आणि संगिता दिलीप ओसवाल (वय-58) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अरशद उस्मान तांबोळी (वय-32 रा. पद्मजी पार्क, सहावा मजला, भवानी पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरशद आणि आरोपी हे मित्र आहेत.
आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने संगनमत करुन अरशद याच्याकडून व्यवसायासाठी 84 लाख रुपये घेतले. तसेच मर्सिडीज गाडी देण्याच्या बहाण्याने 10 लाख रुपये घेतले.
मात्र, आरोपींनी व्यवसायासाठी घेतलेले 84 लाख रुपये परत केले नाहीत.
शिवाय पैसे घेऊन ही मर्सिडीज गाडी दिली नाही.
याप्रकरणी अरशद तांबोळी यांनी न्यायालयात (Court) धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ पोलीस ठाण्यात सी.आर.पी.सी कलम 156(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (Police Sub-Inspector Mira Trimbake) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | FIR against Ronak Dilip Oswal and Sangita Ronak Oswal couple in fraud case of Rs 84 lakh

 

हे देखील वाचा :

Delta Variant | डेल्टापेक्षा जास्त धोकादायक व्हेरिएंट सुद्धा येऊ शकतो समोर? जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

Pune News | खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीचा वाचला प्राण

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Jalgaon Crime | तब्बल 8 महिन्यानंतर आत्महत्येमागील कारण आले समोर

 

Related Posts