IMPIMP

Pune Crime | बॉश कंपनीचे बनावट ऑटो पार्ट विक्री करणार्‍या दुकानदारावर FIR; सहकारनगर परिसरातील 2 दुकानातील 82 हजारांचा माल जप्त

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सहकारनगर परिसरातील दोन दुकानावर सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police) छापा (Raid) घालून बॉश कंपनीचे (Bosch Company) बनावट ऑटो पार्ट (Fake Auto Part) विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी (Pune Police) दुकानदारावर गुन्हा (FIR) दाखल केला असून 82 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. अनुप शिरीष पटनी Anup Shirish Patni (रा. विमल विहार सोसायटी, बिबवेवाडी-Bibwewadi) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे (Pune Crime) नाव आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी रेवणनाथ केकाण Revannath Kekan (वय 40, रा. काळेपडळ, हडपसर-Hadapsar) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवणनाथ केकाण हे प्रोटेक्ट आय पी इंडिया कंपनीत (Protect IP India Company) सिनियर इन्वेस्टिगेट ऑफीसर (Senior Investigating Officer) आहेत. त्यांच्या कंपनीकडे बॉश कंपनीचे कॉपीराइटचे (Copyright) अधिकार आहे.(Pune Crime)

 

 

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दुकानात बॉश कंपनीचे बनावट ऑटो पार्ट विकले जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांची भेट घेऊन त्याची माहिती दिली. त्यांनी सहकारनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी पदमावती (Padmavati) येथील नगिना अपार्टमेंटमध्ये असलेल्या श्री ऑटो टेडिंग या दुकानात छापा घातला. तेथे दुकानाची तपासणी केली असता दुकानात बॉश कंपनीचे 46 हजार रुपयांचे ग्लो प्लग चे 46 बनावट नग मिळून आले. तसेच पुष्पा टॉवरमधील दुसरे दुकान महाराष्ट्र ऑटोलाईन येथे छापा घातला असता तेथे 36 हजार रुपयांचे बनावट 36 नग आढळून आले. सहकार नगर पोलिसांनी हा सर्व माल जप्त करुन पटणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title : Pune Crime | FIR against shopkeeper selling counterfeit Bosch auto parts; 82 thousand goods seized from 2 shops in Sahakarnagar area

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | एसटी विलिगीकरणाचा मुद्दा तर NCP च्या जाहीरनाम्यात, मग का पूर्ण नाही?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Ayurveda And Smoking | धुम्रपानाचे व्यसन सुटत नाही का? मग जाणून घ्या आयुर्वेद तज्ज्ञांकडून यावर उपाय

Indian Railways | गर्दीच्या ट्रेनमधून पडल्याने जखमी होणार्‍या व्यक्तीला रेल्वेने द्यावी नुकसान भरपाई; मुंबई HC चा आदेश

 

Related Posts