IMPIMP

Pune Crime | शिरुरमध्ये मद्यपी एसटी बस चालक आणि वाहकाचं ‘डांगडिंग’,सर्वत्र खमंग चर्चेला उधाण; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime | FIR on drunken ST bus driver and carrier in Shirur, discussion everywhere; Learn the case

पुणे / शिरूर : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिरूर येथील एसटी डेपोतील वाहक व चालक हे दारु पिऊन (Alcohol) गाडी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरुर एसटी आगार प्रमुखांनी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur police station) दोघांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुण्यातील (Pune Crime) या धक्कादायक प्रकारामुळे एसटीचा प्रवास सुरक्षीत आहे का असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शिरुर पोलिसांनी आगार व्यवस्थापकांच्या तक्रारीवरुन एसटी चालक प्रकाश बाळकिसन गवळी (रा. कानडगाव ता. चांदवड जि. नाशिक) व वाहक संकेत वसंत पाचोरे (रा. जवळके पोस्ट पोयगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिरुर एसटी स्थानकाचे आगार प्रमुख महेंद्र दिनकर माघाडे Mahendra Dinkar Maghade (वय -58 रा. शिरूर ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शिरुर एसटी स्थानकातील एमएच 14 बिटी 3331 या एसटीवर प्रकाश गवळी यांना चालक म्हणून तर संकेत पाचोरे यांना वाहक म्हणून नेमण्यात आले होते.
त्यांच्या ताब्यात एसटी बस असताना दोघे दारू पिऊन एसटी मध्ये प्रवाशांची वाहतूक करत
असल्याचे आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यांच्या निदर्शनास आले.
मागाडे यांनी दोघांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले असताना चालक प्रकाश गवळी व
वाहक संकेत पाचोरे दोघे त्यांच्यावरील कारवाई व वैद्यकीय तपासणी टाळण्यासाठी पळून गेले.
त्यांनतर वाहक संकेत पाचोरे हा हजर झाला.
याबाबत शिरुर एसटी स्थानकाचे आगार प्रमुख महेंद्र माघाडे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत (Police Inspector Suresh Kumar Raut)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित कडूस (Police Naik Amit Kadus) हे करत आहे.

 

Web Title :- Pune Crime | FIR on drunken ST bus driver and carrier in Shirur, discussion everywhere; Learn the case

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | टूथपेस्ट समजूर रॅट किलरने स्वच्छ केले दात, अखेर मुलीचा झाला मृत्यू

Pune NCP | राष्ट्रवादीकडून बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9 च्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

 

Related Posts