IMPIMP

Mumbai Crime | टूथपेस्ट समजूर रॅट किलरने स्वच्छ केले दात, अखेर मुलीचा झाला मृत्यू

by nagesh
Mumbai Crime | a girl brushes teeth with rat poison cream instead of toothpaste dies in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | मुंबईतील धारावी परिसरात राहणार्‍या एका 18 वर्षाच्या मुलीने उंदीर मारण्याच्या औषधाला टूथपेस्ट समजून दात स्वच्छ केले. यानंतर मुलीचा मृत्यू (Mumbai Crime) झाला. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 3 सप्टेंबरच्या सकाळी तिच्या घरी घडली, तिचे नाव अफसाना खान आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसाना नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्यासाठी गेली. परंतु चुकून तिने टूथपेस्टच्या जवळ ठेवलेली उंदीर मारण्याची क्रीम ब्रशवर घेऊन ब्रश केला. नंतर थोड्यावेळातच तिला चव आणि वास येणे बंद झाले. तिने तोंडातून विष बाहेर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला बाथरूममध्ये चक्कर येऊ लागली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

घरातील लोकांना सांगितले नाही
घरातील लोक ओरडतील म्हणून तिने कुणालाही न सांगताच काही औषधे घेतली. कारण तिला पोटात गंभीर वेदना आणि अस्वस्थता जाणवत होती, परंतु बरे वाटले नाही. यानंतर तिला तीन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

प्रकृती बिघडत गेल्यानंतर तिने अखेर आपल्याकडून झालेली चूक घरच्यांना सांगितली.
नंतर तिला 12 सप्टेंबरला उपचारासाठी सर जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
मात्र, तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

अफसानाच्या कुटुंबात आई-वडील, एक मोठी बहिण आणि दोन छोटे भाऊ आहेत.
अफसानाने लॉकडाऊन दरम्यान शाळा सोडली होती.
तिचे कुटुंब फळाचा छोटासा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवते.

 

Web Title :- Mumbai Crime | a girl brushes teeth with rat poison cream instead of toothpaste dies in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune NCP | राष्ट्रवादीकडून बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9 च्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

Madras High Court | वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा ! कार खरेदीवर पाच वर्षाची विमा सक्ती नाही – उच्च न्यायालय

 

Related Posts