IMPIMP

Pune Crime | आधी रुफ टॉप हॉटेल, त्यात बेकायदा हुक्का बार अन् मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावणार्‍या हॉटेलवर कारवाई

by nagesh
Pune Crime | First, action was taken against the roof-top hotel, which had an illegal hookah bar and a hotel with a loud sound system.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | आगीच्या घटना घडल्याने महापालिकेने रुफ टॉप हॉटेलवर बंदी घातली आहे. असे असताना रुफ टॉपवर हॉटेल सुरु ठेवले. त्यात बेकायदेशीरपणे हुक्काबार (Hookah Bar) सुरु केला. इतकेच नाही तर नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम (Sound System) लावून एकाच वेळी अनेक गुन्हे करणार्‍या हॉटेलवर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढव्यातील सिल्वर स्पुन हॉटेलवर (Silver Spoon Hotel, Kondhwa) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा व विमाननगर परिसरात हुक्का बार व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) सिल्वर स्पुन हॉटेलवर छापा टाकला. तेथील ४ हजार ८०० रुपयांचे हुक्क्याचे साहित्य जप्त केले. तसेच तेथील २ लाख ८५ हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे.

 

विमाननगरमधील मस्क्यिुटर्स या हॉटेलमध्ये (Musketeer’s Hotel) मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम
सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या हॉटेलमधील २ लाख ३४ हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम जप्त
करण्यात आले आहे. दोन्ही कारवाईमध्ये ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
(Pune Crime)

 

सामाजिक सुरक्षा विभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार
(Senior Police Inspector Vijay Kumhar), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे
(Assistant Police Inspector Aniket Pote), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे,
मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | First, action was taken against the roof-top hotel, which had an illegal hookah bar and a hotel with a loud sound system.

 

हे देखील वाचा :

Shradha Walker Murder Case | दिल्ली मर्डर प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत ; मेरा अबदुल ऐसा नही म्हणत…

ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

World Diabetes Day | जागतिक मधूमेह दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

 

Related Posts