IMPIMP

Shradha Walker Murder Case | दिल्ली मर्डर प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत ; मेरा अबदुल ऐसा नही म्हणत…

by nagesh
Shradha Walker Murder Case | actress ketaki chitale shared post about shraddha walker murder case

सरकारसत्ता ऑनलाईन  – सध्या सर्वत्र चर्चा आहे ती दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची (Shradha Walker Murder Case). कारण ही हत्या इतकी भयंकर होती की ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकली. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पूनावाला (Aftab Poonawalla) याने तिची हत्या करून तिचे 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले होते. सहा महिन्यांपूर्वी श्रद्धाची हत्या करून आफताब मागच्या तीन आठवड्यांपासून श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत (Shradha Walker Murder Case) होता. मात्र आखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशभरातून या प्रकरणावर संतप्त व्यक्त करण्यात येत आहे. तर आता अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने देखील यावर तिचे मत मांडले आहे. सध्या केतकीची पोस्ट सर्वत्र व्हायरल (Post Viral) होताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या संपूर्ण प्रकारावर केतकीने आपले मत मांडले यावर ती म्हणाली, “मेरा अबदुल ऐसा नही. बरोबर आहे.
कारण आप मेलं, जग बुडालं. पण 35 तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा ( यावेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात? #जागो मेरे देश”. यापुढे ती म्हणाली, “सनातनी मुलांना तुम्हालाही सुधारण्याची गरज आहे. तुम्ही जोवर तुमच्या पोकळ पुरुषार्धावर प्रेम करत राहाल तोवर मुली अबदुल, आफताब, अहमदबरोबर दिसणार. कारण मुलींना पटवण्याबरोबर ते मुलींना अटेंशन देतात, मग मर्डर करतात. तुम्ही मुलींना आधी नाकारता आणि तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करता”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केतकीच्या या पोस्टने सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे. तर अनेकांनी केतकीच्या पोस्टचे समर्थन देखील
केले आहे. या हत्याप्रकरणी आफताबला विचारले असता त्याने हा खून काही वेब सिरीज पाहून केल्याचा खुलासा
केला आहे. डेक्स्टर (Dexter) ही अमेरिकी या वेबसिरीज मधून प्रेरणा घेत त्याने या हत्येचे कट रचला होता.
तर श्रद्धा ही मूळची मुंबईत राहणारी होती नोकरीकरिता ती बॉयफ्रेंड आफताबबरोबर दिल्लीमध्ये राहत होती.

 

 

Web Title :- Shradha Walker Murder Case | actress ketaki chitale shared post about shraddha walker murder case

 

हे देखील वाचा :

ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Pune Crime | तडीपार गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खून; कोंढव्यातील अशोका म्युज सोसायटीजवळील घटना

 

Related Posts