IMPIMP

Pune Crime | 10 हजारांचा हप्ता न दिल्याने हॉटेल चालकावर तलवारीने वार करुन केली तोडफोड

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे \ पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मागितलेला १० हजार रुपयांच्या हप्त्याची खंडणी (Extortion) न दिल्याने दोघा गुंडांनी हॉटेल चालकावर तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. हॉटेलमधील सामानाची तोडफोड करुन शेजारील दुकानदारांमध्ये दहशत पसरविली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) ओकांर ऊर्फ हेमंत ओव्हाळ (Onkar alias Hemant Ovhal) आणि अक्षय जगताप Akshay Jagtap (दोघेही रा. भीमनगर, चिंचवड) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत राजेंद्र जयकर शेट्टी Rajendra Jaykar Shetty (वय २८, रा. भीमनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५४/२२) दिली आहे. हा प्रकार चिंचवडमधील चेतना रेस्टॉरंट अँड बारमध्ये (Chetna Restaurant & Bar) मंगळवारी दुपारी पावणेपाच वाजता घडला. (Pune Crime)

 

फिर्यादी शेट्टी यांचे चेतना रेस्टॉरंट अँड बार आहे. दोघा गुंडांनी त्यांच्या हॉटेलमध्ये सकाळी येऊन १० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता.
त्यांनी तो देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने सायंकाळी पावणेपाच वाजता ते दोघे पुन्हा हॉटेलमध्ये आले.
त्यांनी तलवारीने शेट्टी यांच्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली.
त्यांच्या हॉटेलशेजारील श्री ग्राफिक्स फ्लेक्स प्रिंटींग (Shri Graphics Flex Printing)
व कुष्णा सुपर मार्केट (Kushna Super Market) चालकांना शिवीगाळ करुन तलवारीचा धाक दाखविला.
त्यांच्याकडे हप्ता मागून दुकान बंद करायला लावले.
हातातील तलवारी हवेत फिरवत दहशत निर्माण करुन निघून गेले.
चिंचवड पोलीस आरोपींचा शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक मन्सुर मणेर (Sub-Inspector of Police Mansoor Maner) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | For not paying the installment of 10,000, the hotel driver was stabbed with a sword and vandalized

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात माहिती

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय, शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद

Pune Crime | मुलांना फायर गेमची डायमंड मेंबरशिपच्या बहाण्याने वडिलांचा पासवर्ड चोरुन सव्वा लाखांना घातला गंडा

 

Related Posts