IMPIMP

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात माहिती

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Shinde Group) यापैकी शिवसेना (Shivsena) कोणाची याचा फैसला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल (Kapil Sibal), हरीश साळवे (Harish Salve), अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) हे वरिष्ठ वकील दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करत आहेत. शिंदे गटाच्या बाजूने युक्तीवाद करताना हरीश साळवे यांनी शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य (Maharashtra Political Crisis) नसल्याचं त्यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसलेले आणि बदल घडवणारे आमदार (MLA) मोठ्या संख्येने असतील, तर नेतृत्वाची नवी स्पर्धा असावी असे ते का म्हणू शकत नाहीत ? मुख्यमंत्री भेटण्यास नकार देतात. मुख्यमंत्री बदल हवा असल्यास ही भूमिका पक्षविरोधी नाही. ती पक्षांतर्गत आहे. बहुमत गमावलेल्या पक्षासाठी पक्षांतर बंदी कायदा (Prohibition of Defection Act) हा शस्त्रासारखा वापरू शकत नाही. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेत उरलेले 15 आमदार हे स्वत: ला वाचवण्यासाठी दावा करु शकत नाही.
इथ कुणी पक्षच सोडलेला नाही, असं हरीश साळवे यांनी सांगितले.
तुम्ही कोण आहेत ? कोर्टाच्या या प्रश्नावर आम्ही पक्षात मतभेद करणारा सदस्य आहोत, अशी हरीश साळवे यांनी बाजू मांडली.

 

भारतात आपण राजकीय पक्षांना नेता हाच सर्व काही समजला जातो. मी शिवसेनेत आहे. माझे मुख्यमंत्री मला भेटण्यास नकार देतात.
मी तथ्यांचा वाद घालत नाही, सिद्धांतिक तथ्ये देत आहे. मला मुख्यमंत्री बदल हवा आहे.
ते पक्षविरोधी नाही. केवळ बहुमताच्या जोरावर ते कायदेशीर वैधता मिळवून घेऊ शकत नसल्याचे शिवसेनेचे वकील सिंघवी यांनी युक्तीवाद केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | leadership of uddhav thackeray is not acceptable shinde group inform in the supreme court

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय, शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद

Pune Crime | मुलांना फायर गेमची डायमंड मेंबरशिपच्या बहाण्याने वडिलांचा पासवर्ड चोरुन सव्वा लाखांना घातला गंडा

Pune Crime | डोक्यात मारहाण करुन महिलेचा खून, कारण अद्याप अस्पष्ट

 

Related Posts