IMPIMP

Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या हंबीरवरील हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक; वडकीतील खूनाचा बदला घेण्यासाठी झाला हल्ला

by nagesh
Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | वडकी येथे २०१६ मध्ये झालेल्या खूनाचा बदला (Revenge Of Murder) घेण्यासाठी हिंदु राष्ट्र सेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर (Tushar Hambir) याच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) शिरुन गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundagarden Police) चौघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सागर हनुमंत ओव्हाळ Sagar Hanumant Ovhal (वय २२, रा. बनकर कॉलनी, हडपसर), बालाजी हनुमंत ओव्हाळ Balaji Hanumant Ovhal (वय २३), सुरज शेख Suraj Shaikh (वय १९, रा. हरपळे चाळ, हडपसर), सागर आटोळे Sagar Atole (वय २१, रा. वडकी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार साहील इनामदार (Sahil Inamdar) याचा शोध घेण्यात येत आहे. (Pune Crime)

 

 

तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयातील इन्फोसीस इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर उपचार करण्यात येत आहे.
त्याला हाडांचा व स्नायू दुखण्याचा त्रास होत असून चालताना त्रास होतो.
सोमवारी रात्री मित्र असल्याचे सांगून पाच जण ससून रुग्णालयात शिरले. त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून तुषार हंबीरच्या दिशेने गोळीबार (Firing) केला.
परंतु, पिस्तुलातून गोळी फायरच झाली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार आजू बाजूला असलेल्यांच्या लक्षात आला.
तेथेच पोलीस बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी बागड (Police Baghd) व हंबीर याचा मेव्हणा शुभम रांदड (Shubham Randad) हे सावध झाले.
हल्लेखोर तलवार व कोयत्याने हंबीर याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न करीत असतानाच हे दोघे मध्ये पडले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार करुन जखमी केले. पोलीस गार्ड बागड यांनी रायफल काढल्याने हल्लेखोर पळून गेले होते.

 

 

ससून रुग्णालयात झालेल्या या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. बंडगार्डन व हडपसर पोलिसांची (Hadapsar Police) पथके हल्लेखोरांचा तपास करीत होते. (Pune Crime)

 

 

वडकी (Vadaki, Pune) येथील गायकवाड याचा तुषार हंबीर व त्याच्या साथीदारांनी २०१६ मध्ये खून केला होता.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) याबाबत ३०२चा गुन्हा दाखल होता.
त्या गुन्ह्यात तुषार हंबीरला मोक्का लावण्यात आला आहे. त्या गुन्ह्यामध्ये तो येरवडा कारागृहात (Yerwada Jail) न्यायालयीन बंदी म्हणून आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Four arrested in Hindu Rashtra Sena’s Hambir attack case; The attack took place to avenge the murder in Vadaki

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | 7000 रुपयाची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह दोघांना अटक

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

 

Related Posts