IMPIMP

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

by nagesh
MNS-Shinde Group Alliance | if balasahebs prediction that shiv sena mns should come together comes true its good says eknath shinde group spokesperson kiran pawaskar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS-Shinde Group Alliance | बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नेतृत्वात पुढे जात आहे. शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. मात्र, यावर आत्ताच सांगणं कठीण होईल. मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावर एकत्र येत असतील ते हे नैसर्गिक आहे, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Spokesperson Kiran Pavaskar) यांनी मनसे-शिंदे गट युतीचे (MNS-Shinde Group Alliance) संकेत दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किरण पावसकर म्हणाले, मुंबई पालिकेत (BMC) कोणासोबत युती (MNS-Shinde Group Alliance) होईल याबाबत अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत शिवसेनेतून त्यावेळी नेते बाहेर पडले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. माझा राग विठ्ठलावर नाही, तर आजूबाजूला असलेल्या बडव्यांवर आहे असं राज ठाकरेंनी पहिल्याच भाषणात म्हटलं होतं. राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहे.

 

राज ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी जी भूमिका मांडली ती सर्वांना माहित आहे.
आज एवढ्या वर्षाने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनाप्रमुखांवर (Shiv Sena chief) प्रेम करणारे परंतु कार्यपद्धती वेगळी असणारे, दैवत आमचं एकच आहे.
परंतु आजूबाजूच्या बडव्यांमुळे एकनाथ शिंदे याच्यासोबत शिवसैनिक बाहेर पडले.
याचा अर्थ मनसे आणि आमचा उद्देश एकच आहे. हिंदुत्वासाठी काम करण्याची वृत्ती आहे.
मराठी माणसांसाठी लढणारी संघटना सर्वश्रूत आहे. जे 10-12 वर्षापूर्वी बाहेर पडले त्याच प्रकारे
शिंदे सोबत 40 आमदार त्याच उद्देशाने बाहेर पडलेत, असं किरण पावसकर यांनी म्हटले.

 

Web Title :- MNS-Shinde Group Alliance | if balasahebs prediction that shiv sena mns should come together comes true its good says eknath shinde group spokesperson kiran pawaskar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने व नातवाने कट रचून केला खून, मृतदेहाचे तुकडे करुन फेकले मुळा-मुठा नदीत

Krushi Utpanna Bazar Samiti Maharashtra Elections | राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

 

Related Posts