IMPIMP

Pune Crime | चारचाकी वाहने चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखांची वाहने जप्त

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे शहर आणि परिसरात रेकी करुन वाहने चोरून त्याची विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) दोन ने अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 12 लाख 13 हजार 869 रुपयांची 5 चारचाकी (Four wheeler) वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई हवेली तालुक्यातील थेऊरगाव येथील वृंदावन मंगल कार्यालय (Pune Crime) येथे केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गणेश अरुण राऊत (वय – 34 रा. राऊत वस्ती, पेनुर, ता. मोहोळ जि. सोलापूर), धनाजी नागनाथ लोकरे (वय – 37 रा.लवूळ ता. माढा, जि. सोलापूर), आबा दत्तात्रय डोके (वय – 24 रा. टेकळे वस्ती, पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), विजय बोरवडे (रा. बीड) यांना अटक करण्यात आली आहे. तर अक्षय उर्फ भैय्या चव्हाण, रा. हडपसर, पुणे) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime)

 

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोन चे अधिकारी व अंमलदार कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल असलेल्या वाहन चोरीचा गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे (Amol Sartape), संदीप येळे (Sandeep Yele) व राहुल इंगळे (Rahul Ingle) यांना माहिती मिळाली की गणेश राऊत, धनाजी लोकरे, आबा डोके यांच्याकडे वाहनाचा नंबर खोडलेला एक महिंद्रा ट्रॅक्टर (Mahindra Tractors) व नंबर प्लेट नसलेली एक मारुती सुझुकी वॅगनार (Maruti Suzuki Wagoner) ही चारचाकी वाहने आहेत.

 

आरोपींचा शोध घेत असताना आरोपी वृंदावन मंगल कार्यालय थेऊरगाव येथे संशयितरित्या आढळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या वाहनापैकी ट्रॅक्टर हा कोंढवा येथून चोरल्याचे निष्पन्न झाले.
तसेच वॅगनर कार लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले.
त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून पुढील तपास केला असता त्यांच्या मदतीने त्याचा आणखी एक साथीदार आरोपी समाधान उर्फ माऊली शिवाजी चौरे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोपी चौरे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने वरील वाहने त्यांचा आणखी एक साथीदाराला वाहने चोरी करणेकरीता सॅन्ट्रो कार आरोपींना दिल्याची माहिती समोर आली.
आरोपींनी पुणे शहरातून वाहने चोरी करून विजय बोरवडे याच्या बीड येथील साईनाथ मोटर्स दुकानात विकण्यासाठी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
3 चारचाकी वाहने यामध्ये महिंद्रा बोलेरो जीप, पिकअप जीप व अशोक लेलँड दोस्ती टेम्पो अशी वाहने अटक आरोपी गणेश राऊत याने दिल्याची कबुली विजय बोरवडे याने दिली.

 

पोलिसांनी 12 लाख 13 हजार 869 रुपये किंमतीची 1 मारुती सुझुकी वॅगनार, 1 महिंद्रा पिकप, 1 महिंद्रा बोलेरो, 1 ट्रॅक्टर व ट्रॉली,
1 अशोक लेलँड दोस्ती अशी एकूण 5 वाहने जप्त केली.
तर ही वाहने चोरी करण्यासाठी रेकी करणारा त्यांचा फरार साथीदार आरोपी अक्षय उर्फ भैय्या चव्हाण हा चोरीचे वाहनाचे व ठिकाणाची रेकी करून तशी माहिती आरोपींना देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींकडून पुणे शहरातील कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस स्टेशन मधील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर (Police Inspector Sunil Pandharkar),
सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी (API Vivek Padavi) व पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे,
दिनकर लोखंडे,
अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाने, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे,
राहुल इंगळे, संदीप इंगळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Four wheeler stealing gang busted by pune police crime branch vehicles worth 12 lakhs seized

 

हे देखील वाचा :

Share Market | एक्सपार्टना ‘या’ 10 शेअरवर आहे विश्वास, 3-4 आठवड्यातच बदलू शकतात तुमचे नशीब

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षाची भाडेवाढ ! ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

 

Related Posts