IMPIMP

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षाची भाडेवाढ ! ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार

by nagesh
Pune Rickshaw Strike | auto rickshaw drivers firm on protest today 12th december pune RTO office news

पुणे :  सरकारसत्ताऑनलाइनPune Rickshaw Fare Increase | सीएनजी दरवाढीचा (CNG Price Hike) थेट फटका आता रिक्षा प्रवाशांना बसणार आहे. इंधनातील दरवाढ लक्षात घेता पुणे, पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri-Chinchwad) आणि जिल्ह्यात रिक्षाच्या भाडेवाढीला (Pune Rickshaw Fare Increase) मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाच्या पहिल्या दीड किमीच्या टप्प्यासाठी दोन रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किमीसाठी रिक्षा प्रवाशाला एक रुपया जादा भाडे मोजावे लागणार आहे. 1 ऑगस्टपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (Pune Regional Transport Authority) बैठकीत घेण्यात आला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सीएनजीच्या दरात वाढ
सीएनजीच्या दरामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. इंधनातील ही दरवाढ लक्षात घेता रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ देण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. रिक्षा भाडे वाढीबाबत (Pune Rickshaw Fare Increase) खटुआ समितीच्या (Khatua Committee) शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला.

 

कशी होणार दरवाढ
सध्या रिक्षाच्या पहिल्या दीड किमीच्या टप्प्यासाठी 21 रुपये आकारण्यात येत आहेत. त्यात आता दोन रुपयांची वाढ होणार असून, पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना 23 रुपये मोजावे लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी 14 ऐवजी 15 रुपयांची भाडे आकरणी केली जाणार आहे.

 

बदललेल्या भाडे दरानुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी 1 ऑगस्टपासून 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
1 ऑगस्टपर्यंत मीटरचे प्रमाणीकरण केलेल्या रिक्षांसाठीच नवे भाडेदर लागू असतील.
अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणचे सचिव डॉ. अजित शिंदे (RTO Dr. Ajit Shinde) यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Rickshaw Fare Increase | auto rikshaw fare hiked by 2 rupees in pune maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

Nitin Gadkari | ‘… राजकारण सोडावंसं वाटतं’; नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले…

CM Eknath Shinde | ‘…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता’, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

 

Related Posts