IMPIMP

Pune Crime | मेडिकल व्यावसायात गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची 41 लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मेडिकल व्यावसायात (Medical Business) गुंतवणूक (Investment) करण्यास सांगून त्यातून मिळणारा नफा निम्मा – निम्मा वाटून घेऊ असे आश्वासन देऊन एका महिलेला पैसे गुंतवण्यास भाग पाडले. यानंतर कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता मेडिकल दुकानातील सामान परस्पर घेऊन जाऊन महिलेची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत घडला आहे. पोलिसांनी (Pune Police) गणेश ढेरे (Ganesh Dhere) याच्या विरुद्ध IPC 406, 463, 468, 471 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत रास्ता पेठेत (Rasta Peth) राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेने समर्थ पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून गणेश ढेरे (रा. मु. पो. विट ता. करमाळा जि. सोलापूर – Solapur) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2015 ते 2020 या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) गुरुवार पेठ, लक्ष्मीनगर पर्वती (Laxmi Nagar Parvati), राष्ट्रभुषण चौक (Rashtrabhushan Chowk), रास्ता पेठ याठिकाणी घडला आहे. फिर्यादी महिलेने न्यायालयात याबाबत याचिका (Petition) दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (PSI Mira Trimbake) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वीपासून ओळख होती. आरोपी गणेश याने फिर्यादी महिलेला मेडिकल व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून त्यातून होणारा नफा 50 – 50 टक्के घेऊ असे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने गणेश ढेरे याला चेक आणि रोख स्वरुपात 28 लाख रुपये दिले. मात्र आरोपीने केणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही.

 

आरोपीने पुण्यात वैभवी मेडिकल या नावाने गुरुवार पेठे, लक्ष्मीनगर पर्वती, राष्ट्रभुषण चौक, रास्ता पेठ येथे मेडिकल दुकान सुरु केले.
आरोपीने दुकानाचा पत्ता बदलण्यासाठी दोन वेळा 100 रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या.
यावर खोटे संमतीपत्र तयार करुन 17 लाख आणि दुकानातील 24 लाखाचा माल फिर्यादी यांना काहिएक कल्पना न देता घेऊन गेला.
तसेच फिर्यादी यांचे संमतीपत्र/दस्तऐवज तयार करुन त्यांची 41 लाखांची फसवणूक केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (PSI Mira Trimbake) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 41 lakh for asking woman to invest in medical profession

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन दिली जीवे मारण्याची धमकी, येरवडा परिसरातील घटना

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणारी रेणू शर्मा कोण ? ‘5 कोटी रूपये आणि एक दुकान द्या नाहीतर…’;IPS Deepak Pandey | बदलीनंतर नाशिक पोलीस आयुक्त म्हणाले – ‘मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण…’

 

Related Posts