IMPIMP

Kirit Somaiya | 10 दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार

by nagesh
Kirit Somaiya on INS Vikrant | bjp leader kirit somaiya challege to thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत आहे. दैनंदिन बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभं राहिलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोविड सेंटर (Covid Center) सुरू करावे लागत आहेत. दरम्यान या कोविड सेंटरच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे (BJP) जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आणखी एकदा महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) गंभीर आरोप केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किरीट सोमय्या म्हणाले, ‘पुढच्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा उघड करणार असल्याचा इशाराच सोमय्या
यांनी दिला आहे. त्याच बरोबर कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचं कमाईचे साधन असल्याचा गंभीर आरोप देखील किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

 

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी पाहायला मिळते. यातच मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेते, मंत्री यांच्यावर आरोपांचे सत्र सुरूच ठेवले आहे. यानंतर आता सोमय्यांनी थेट कोविड सेंटर घोटाळा उघड करणार असल्याचा गंभीर इशारा दिला असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या आरोपानंतर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहावे लागणार आहे.

 

Web Title: Kirit Somaiya | thackeray government covid center scam to be exposed in ten days bjp leader kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन

Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

Pune Crime | चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज केला लंपास

 

Related Posts