IMPIMP

Pune Crime | पुण्यात अंधश्रद्धेचा कळस ! पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्यास भाग पडले

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुरोगामी महाराष्ट्रातील पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली. तसेच महिलेला वेळोवेळी मारहाण (Beating) करुन तिच्याकडून 1 ते 2 कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वांसमोर अंघोळ (Bath) करण्यास सांगणाऱ्या मांत्रिकाचा देखील (Pune Crime) समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.21) भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेचा पती, सासरे, सासु आणि मांत्रिक यांच्यावर आयपीसी 498 अ, 323, 420, 406, 504, 34 यासह महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार (Maharashtra Prevention of Human Sacrifice and Witchcraft Act) गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांकडून फिर्यादी यांचे वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेऊन त्यावर बनावट स्वाक्षरी करुन 75 लाखाचे कर्ज घेतले. तसेच फिर्यादी यांच्या पतीने व्यावसायात भरभराट आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पूजा केली.

 

फिर्यादी महिलेच्या पती, सासू, सासरे यांनी भानामती नाहीशी व्हावी यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन रायगड येथे नेऊन फिर्यादी
यांना सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. महिलेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar) करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सांस्कृतिक नगरी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
अंधश्रद्धेच्या विरोधात संघर्ष करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Eradication Committee) अध्यक्ष स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar)
यांच्या पुण्यात अशा प्रकारची घटना घडल्याने पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला गेला आहे.

 

Web Title :- Pune Crime | husband-forced-to-wife bathe-in-front-of-everyone-shocking-types-in-pune-crime-news-bharti vidyapeeth police station

 

हे देखील वाचा :

Supreme Court | शिंदे-फडणवीस सरकारला ‘सुप्रीम’ दणका, BMC वॉर्ड फेरबदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश;

Vinayak Mete Accident | अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिल्या ‘या’ 2 महत्वपूर्ण सूचना, गृहमंत्र्यांनी दिलं आश्वासन

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात डेटिंग अ‍ॅपवरुन राष्ट्रीय महिला खेळाडूची फसवणूक, 50 वर्षाच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार

 

Related Posts