IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयातच पतीने पत्नीचा एका बुक्कीत पाडला दात

by nagesh
Pune Crime | In Pune's family court, the husband knocked his wife out of a book

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | घटस्फोटात (divorce) नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने भर कौटुंबिक न्यायालयातच पत्नीच्या तोंडावर जोरात बुक्की मारुन तिचा दात (Pune Crime) पाडला. ही घटना शिवाजीनगर येथील कौंटुंबिक न्यायालयातील (family court pune) दुसर्‍या मजल्यावरील समुपदेशन केंद्राच्या बाहेर २७ नोव्हेबर रोजी दुपारी ३ वाजता घडली.

याप्रकरणी सोलापूर (Solapur) येथे राहणार्‍या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी सचिन विकास पवार (वय ३४, रा. खेसे पार्क , विमाननगर) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत. दोघेही सध्या वेगळे रहात आहेत.
घटस्फोटाच्या केसच्या कौन्सिलिंगसाठी ते शिवाजीनगर येथील कौटुबिक न्यायालयात आले होते.
यावेळी समुपदेशन केंद्रात फिर्यादी यांनी त्यांच्या पतीच्या विनंतीप्रमाणे घटस्फोट देण्यास नकार दिला.
त्यानंतर ते केंद्राच्या बाहेर आल्यावर सचिन पवार याने फिर्यादी यांच्या तोंडावर हाताने जोरात बुक्की मारली.
त्यात फिर्यादी यांचा एक दात पडला व खालील बाजूचा एक दात अर्धा तुटून त्या जखमी झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | In Pune’s family court, the husband knocked his wife out of a book

हे देखील वाचा :

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा

Isha Ambani | अबब…! मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3 लाखाचा ड्रेस घालून केलं फोटोशूट

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)

Related Posts