IMPIMP

Pune Crime | शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये म्हणून पत्नीचा गळा दाबून मंगळसुत्र चोरले

by nagesh
Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime| ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये, या कारणावरुन पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून मारहाण (Pune Crime) केली. तिची दुचाकी दगडाने फोडली. तसेच तिच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र तोडून चोरुन नेल्याचा प्रकार शिरुर तालुक्यात घडला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी 30 वर्षीय विवाहीतेने शिरुर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिरुर पोलिसांनी त्यांचे पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी (Pune Crime) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहीता या शिरूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या १ वर्षांपासून त्या कामाला जात नाहीत. त्याचे व त्यांच्या पतीचे कौटुंबिक कारणावरुन वाद आहेत. फिर्यादी यांनी पतीविरुद्ध यापूर्वी छळ केल्याची तसेच मारहाणीच्या दोन तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. ग्राम पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात त्या उपोषण करणार होत्या. त्यासाठी त्या शिरुरमधील पंचायत समितीच्या बाहेर २० सप्टेंबर रोजी थांबल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंचायत समितीच्या मागील गेटसमोर लावलेली दुचाकी त्यांच्या पतीने दगडाने फोडून नुकसान केले. तसेच त्या व त्यांच्या मैत्रिणीच्या अंगावर धावून गेला. फिर्यादीला शिवीगाळ करुन त्यांचा गळा दाबून झटापट करुन त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र जबरदस्तीने तोडून चोरुन नेले. शिरुर पोलीस तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Mangalsutra stolen by strangling wife to avoid hunger strike against corrupt Gram Panchayat

हे देखील वाचा :

Saibaba Sansthan Shirdi | शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक

Pune News | ‘ई-फेरफार’ योजनेत आता ‘प्रॉपर्टी कार्डचाही समावेश

Gold Price Today | खुशखबर ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

Related Posts