IMPIMP

Pune Crime | कोंढव्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime Married woman commits suicide by hanging herself in Kondhwa A case has been registered against the three including the husband

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सासरी होणार्‍या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधाराणी संदीप वाघे (वय २४, रा. आशियाना ड्रीम, कोंढवा) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सिद्धलिंग सिद्राम कुसनेरे (वय १९, रा. नागराह, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ८७३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती संदीप नामदेव वाघे, सासु शकुंतला वाघे, यशोदा राहुल लिंबाचे (सर्व रा. आशियाना ड्रीम, कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना २८ मार्च ते २६  ऑगस्ट २०२२ दरम्यान घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण सुधाराणी तिचा संदीप वाघे याच्याबरोबर विवाह झाला.
विवाहानंतर तिचा संदीप व इतरांनी वारंवार शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
या छळाला कंटाळून सुधाराणी हिने २६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : –   Married woman commits suicide by hanging herself in Kondhwa A case has been registered against the three including the husband

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts