IMPIMP

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

by nagesh
pune-crime-mob-attacks-on-pune-police-in-yerwada-area-in-self-defence-police-inspector-gade-fire-in-air

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरात घुसून कुटुंबाला मारहाण करणार्‍या सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला (Attack On Police In Pune) केला. जमावाने केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार (Firing in Air) केला. ही घटना येरवडा (Yerwada News) येथील पोतेवस्ती येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एक पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे (Pune Crime) नागरिकांनी स्वागत केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील पोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची (Mhada) इमारत आहे. येथील
नागरिकांना शक्तीसिंह सुरजसिंग बावरी Saktisinha Surajsinha Bavri (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते. गाड्यांमधील पेट्रोल
चोरणे, घराचे दरवाजे खिडक्या फोडणे, टेरेसवर परवानगी न घेता जाऊन दारु पिणे, पत्ते खेळत बसणे असे प्रकार करुन सोसायटीत तो व त्याचे
साथीदार गोंधळ घालत आले आहेत. त्यामुळे या सोसायटीतील २०० घरांपैकी १७९ फ्लॅटधारक सोसायटी सोडून दुसरीकडे राहत आहे. बुधवारी रात्री ख्रिश्चन समाजातील एका कुटुंबाच्या घरात शिरुन शक्तीसिंहने मारहाण (Pune Crime) केली होती. त्याची गस्तीवरील पोलिसांना याची माहिती
मिळाल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector Yunus Shaikh), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP
Kishor Jadhav) यांना त्याची माहिती दिली.

 

पोलिसांनी त्यांना तेथे जाऊन शक्तीसिंह याला हटकले. यावेळी त्याने आपल्या समाजातील लोकांना भडकाविले. लोकांचा मोठा जमाव तेथे जमला. त्यांनी
पोलीस निरीक्षक गाडे (Police Inspector Gade) व कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे प्रकार पाहिल्यावर पोलिसांनी हवेत
गोळीबार (Firing in Pune) केला. गोळीबाराच्या आवाजाने जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून शक्तीसिंह याला अटक (Pune Crime) केली आहे.

शक्तीसिंह याच्या टोळीची सर्वधर्म सोसायटी, अग्रसेन हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, इंद्रप्रस्थ उद्यान, डेक्कन कॉलेज परिसरात दहशत होती.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून हे गुंड प्रवत्तीचे लोक कोणाला ही घाबरत नाही. त्यामुळे यापुढेही पोलिसांनी अशीच कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हे देखील वाचा :

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

Gulabrao Patil | हल्ल्यानंतर एकनाथ खडसेंचा शिवसेनेवर आरोप; गुलाबराव पाटलांनी केला पलटवार, म्हणाले…

 

Related Posts