IMPIMP

Pune Crime | कुत्रीला टेरेसवर फिरायला नेल्यावर झाडुने मारल्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकल्याने कुटुंबाने मारहाण करुन महिलेचा विनयभंग

by nagesh
Pune Crime | Molestation Case Sinhagad Road Police Station And Kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कुत्रीला सोसायटीच्या टेरेसवर फिरायला नेले असताना आरोपींनी तिला झाडुने मारहाण करुन त्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला त्याच सोसायटीत राहणार्‍या कुटुंबाने मारहाण करुन तिचा गाऊन फाडून विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्याच सोसायटीतील ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नर्‍हे येथील श्री होम्स सोसायटीत शनिवारी पावणेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यात (Kondhwa) राहतात. त्या आपली कुत्री रेना हिला घेऊन त्यांच्या आईच्या घरी श्री होम्स सोसायटीत गेल्या होत्या. त्यांनी कुत्री रेना हिला सोसायटीच्या टेरेसवर फिरायला नेले होते. सोसायटीतील एका कुटुंबाने टेरेसवर कुत्र्यांना फिरायला घेऊन यायचे नाही असे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्यांनी कुत्रीला झाडुने मारले. त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ पाहिल्यावर फिर्यादी, त्यांचे वडिल व दीर हे याचा जाब विचारण्यासाठी या कुटुंबाच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी शिवीगाळ करुन धमकी देऊन हाताने, लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांचा गाऊन हाताने फाडून त्यांचा विनयभंग केला. सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Molestation Case Sinhagad Road Police Station And Kondhwa

 

हे देखील वाचा :

Digital Banking Fraud Alert | छोट्या चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक अकाऊंट, डिजिटल बॅकिंगमध्ये ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

Baramati Accident News | भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Pune PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक आरक्षण सोडत मंगळवारी ! कोणाचा पत्ता होणार कट कोणाला मिळणार संधी ?

 

Related Posts