IMPIMP

Baramati Accident News | भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन Baramati Accident News | भरधाव वेगाने जाणारा ट्रक (Truck) हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ट्रकने 4 जणांना चिरडलं असून एका महिलेचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे, तसेच, इतर तीनजण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बारामती तालुक्यातील (Baramati Accident News) सुपे-मोरगाव या अष्टविनायक मार्गावर डायमंड चौक येथे घडली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या अपघातात रुकसाना दिलावर काझी (Ruksana Dilawar Qazi) (वय 45, रा. सुपा, ता. बारामती) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिलावर इस्माईलभाई काझी (Dilawar Ismailbhai Qazi) (वय, 50), सोयल दिलावर काझी (Soyal Dilawar Qazi) (वय 25, दोन्ही रा. सुपा ता. बारामती) आणि मुजाईद अली अहमद अली सय्यद (Mujaid Ali Ahmed Ali Syed) (रा. बिजनोर, ता. धामपूर, राज्य उत्तर प्रदेश) हे जखमी अवस्थेत आहेत. (Baramati Accident News)

 

 

सुपे-मोरगाव मार्गावर (Supe-Morgaon Road) मध्यरात्री शहा मन्सूर बाबा दर्ग्याजवळ असलेल्या डायमंड हॉटेलमध्ये साखरेने भरलेला ट्रक घुसला. मद्यधुंद अवस्थेत चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी सुपे येथील ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital Supe) आणि केडगाव येथील साई दर्शन रुग्णालयात (Sai Darshan Hospital Kedgaon) दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे (Wadgaon Nimbalkar Police Station) पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. याबाबत पोलिस तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Baramati Accident News | truck-accident on supe morgaon highway 1 passed away 3 injured baramati of pune

 

हे देखील वाचा :

Pune PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक आरक्षण सोडत मंगळवारी ! कोणाचा पत्ता होणार कट कोणाला मिळणार संधी ?

11th Admission Process Maharashtra | 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात; अर्ज कसा भराल? जाणून घ्या प्रोसेस

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts