IMPIMP

Pune Crime | पुण्यात अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अनैतिक संबंधाला (Immoral Relations) नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून (Murder in Pune) केल्याची घटना (Pune Crime) पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत रविवारी (दि.7) उघडकीस आली आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये (Bathroom) टाकून फरार झाला आहे. पोलिसांनी गुलाम मोहम्मद शेख Ghulam Mohammad Shaikh (वय-30 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार Bihar) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव (lohegaon) येथील मोझेआळी परिसरातील आरोपी गुलाम हा मयत महिलेच्या घरामध्ये भाड्याने राहात होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर खाली करण्यास सांगितले. रविवारी (दि.7) दुपारी महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी गुलाम हा घरी आला. त्याने तिचा बाथरुममध्ये गळा (Murder in Bathroom) आवळून खून केला.

 

खून केल्यानंतर आरोपी महिलेच्या घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेला. महिलेचा पती आणि मुले कामावरुन घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. त्यांनी तिला संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Crime)

 

मयत महिलेच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरोधात अनैतिक संबंधांना नकार दिल्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) हे करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

 

हे देखील वाचा :

PM Narendra Modi | राष्ट्रवादी काँग्रेसची मोदींवर टीका; म्हणाले, ‘ज्या राज्यात निवडणूक त्याची उचलायची तळी आणि महाराष्ट्राच्या बदनामीचे धोरण एककल्ली

MP Supriya Sule | प्रधानमंत्रीजी… आपसे नाराज नहीं… हैराण हूँ मै ! महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ म्हणून केलेला उल्लेख दुर्दैवी; सुप्रिया सुळेंची PM मोदींच्या भाषणावर सडकून टिका

Kirit Somaiya | किरीट सोमय्या हल्ला प्रकरण ! शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 10 जणांना अटक, आजच कोर्टात हजर करणार

 

Related Posts