IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्या हल्ला प्रकरण ! शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 10 जणांना अटक, आजच कोर्टात हजर करणार

by nagesh
Kirit Somaiya | Shiv Sena city president Sanjay More and 9 others arrested, will be produced in court today, says senior police inspector Anita More of shivaji nagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनKirit Somaiya | भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिकेत (Pune Corporation) शिवसैनिकांकडून (Shivsainik) धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सनी गवते (Sunny Gavate) याला काल (सोमवार) अटक करण्यात आली होती. तर आज शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे (Sanjay More) यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आज (मंगळवार) सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांनी सांगितले, आज 8 आरोपींना अटक केली आहे.
तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणात आतापर्य़ंत 10 जणांना अटक केली आहे.
या सर्वांना आजच शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court Pune) हजर करण्यात येणार आहे.
काल अटक कलेला आरोपी सनी गवते हा या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी असून त्याला जामीन (Bail) मिळाला आहे.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात पुणे शहराध्यक्ष संजय मोरे (Shivsena Pune city president Sanjay More), चंदन साळुंके (Chandan Salunke), किरण साळी (Kiran Sali), सुरज लोखंडे (Suraj Lokhande),
आकाश शिंदे (Akash Shinde), रुपेश पवार (Rupesh Pawar), राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde), सनि गवते (Sunny Gwate) यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाजपचे कार्यकर्ते प्रशांत लाटे (Prashant Late) यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात सनी गवते (वय-32 रा. नाना पेठ) याला अटक (Arrest) करण्यात आली होती.
तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत होते.
त्यामुळे पुणे शहर प्रमुखासह अनेक शिवसैनिक स्वत:हून पोलिसांत हजर झाले आहेत.
या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे प्रकरण ?
शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये (PMC Covid Hospital) झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची (Pune Municipal Commissioner) भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी (दि.5) सायंकाळी पुणे महापालिकेत आले होते.
ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरुन जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले.
त्यांनी सोमय्या यांना धक्काबुक्की केली.

 

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात IPC 143,147,149,341,336,337 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रुपेश पवार,
राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | Shiv Sena city president Sanjay More and 9 others arrested, will be produced in court today, says senior police inspector Anita More of shivaji nagar police station

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime News | 100 रुपये परत न केल्याने मित्रानेच आवळला तरुणाचा गळा; मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून दिले पेटवून

Mumbai Unlock | मुंबईकरांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात 100 टक्के अनलॉक?

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा लवकरच 3 % वाढू शकतो DA, वार्षिक 90,000 रुपयांपर्यंत फायदा; जाणून घ्या कॅलक्युलेशन

 

Related Posts