IMPIMP

Pune Crime News | खुनाच्या तयारीत असलेल्या कोयता गँगला गुन्हे शाखेकडून अटक, कुऱ्हाड, कोयता, गुप्ती, तलवार जप्त

by nagesh
Pune Crime News | Crime branch arrests Koyta gang preparing for murder, seizes axe, Koyta, Gupti, sword

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरात कोयता गँगने (Koyta Gang) दहशत माजवली आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई केली जात आहे. मात्र, कोयता गँगवर याचा काहीच परिणाम होताना पाहायला मिळत नाही. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit-1) पथकाने खुनाच्या प्रयत्नात (Attempted Murder) असलेल्या कोयता गँगला अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून कुऱ्हाड, कोयता, तलवार, गुप्ती असा शस्त्र साठा जप्त (Pune Crime News) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समीर सलीम शेख (वय-19 रा. मक्का मशीद जवळ, कोंढवा), शाहीद फरीद शेख (वय-26 रा. गोयलगार्डन पाठीमागे, कोंढवा) यांना अटक केली आहे. तर त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई (Pune Crime News) मंगळवारी (दि.17) दुपारी कोंढवा येथील गोयल गार्डनच्या (Goyal Garden) पाठीमागील पत्रा शेडमध्ये केली.

 

सलमान महम्मद खान (वय-23 रा. रविवार पेठ) याचे आणि खालीद सय्यद यांचे काही महिन्यापूर्वी वाद झाले होते. त्यावेळी सलमान याने खालीदला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली होती. याचा बदला घेण्यासाठी खालीद व त्याचे साथीदार सलमानचा गेम करण्यासाठी शस्त्र बाळगुन होते. मंगळवारी दुपारी आरोपी हे सलमानचा खून करण्यासाठी गोयल गार्डनच्या पाठीमागे असलेल्या पत्रा शेडमध्ये जमले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना समजली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले, चार महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाची नानापेठ येथील मुलांची आझम कॅम्पस (Azam Campus) येथे भांडणे झाली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलावर लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सलमान याने अल्पवयीन मुलगा आणि नाना पेठेतील मुलांमध्ये समझोता करुन आणला होता. त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगा व कासेवाडी येथील कॉलेज मधील मुलांमध्ये भांडण झाले. त्यावेळी त्या मुलाने आपण सलमानचे नातेवाईक असल्याचे सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अल्पवयीन मुलाने सलमान याला तुझ्या नातेवाईकाने आमच्यासोबत भांडण केले असून तू त्याला समजावून
सांग असे सांगितले. त्यावेळी सलमान याने अल्पवयीन मुलासोबत वाद घालून शिवीगाळ केली.
याचा राग मनात धरुन अल्पवयीन मुलाने सलमान याचा खून करण्याचा करण्याचा पंधरा दिवसांपूर्वी प्लॅन आखला.
सलमानला कॅफे एसजीएस मॉल (Cafe SGS Mall) येथे बोलवून घेतले होते.
त्याठिकाणी सलमान आणि त्याच्या मित्रांसोबत वाद सुरु असताना पोलीस आल्याने प्लॅन फिसकटला.
त्यानंतर मंगळवारी रात्री सलमान कोंढवा येथे येणार असल्याची माहिती समजल्याने त्याचा खून करण्यासाठी
पत्रा शेडमध्ये थांबलो होतो, अशी माहिती अल्पवयीन मुलांनी दिली.
आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करुन आरोपींना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे
(ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले
(Senior Police Inspector Sandeep Bhosale), पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी
(PSI Sunil Kulkarni), अजय जाधव (PSI Ajay Jadhav), पोलीस अंमलदार अनिकेत बाबर,
अभिनव लडकत, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, विठ्ठल साळुंके,
महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Crime branch arrests Koyta gang preparing for murder, seizes axe, Koyta, Gupti, sword

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला; म्हणाल्या – ‘विरोधातील दिवस देखील…’

Chandrakant Patil | भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार?; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भिडे वाडा जागा मालकाची भेट

Yavatmal ACB Trap | दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना नगरसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts