IMPIMP

Chandrakant Patil | भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार?; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भिडे वाडा जागा मालकाची भेट

by nagesh
Chandrakant Patil | guardian ministers chandrakant patil discussion with the original owner vijay dhere of the place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुणे शहरातील भिडे वाडा (Bhide Wada) स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासाठी आता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. मागील काही दिवसांपासून भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या. अशी मागणी केली जात होती. त्यावर ही मागणी मान्य देखील झाली. पण जागेचा प्रश्न उद्भवत होता. त्यामुळे आता भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेत आज (दि.१८) भिडे वाड्याचे जागा मालक आणि पुना मर्चंट बँकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे स्मारक व्हावे ही लोकभावना असल्याने भिडे वाड्याचे स्मारक होणारचं, असा आत्मविश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच जागा मालक विजय ढेरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे (Vijay Dhere) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भिडे वाड्याचे स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आग्रही असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ (Birendra Saraf) यांची भेट घेऊन उच्च न्यायालयात याबद्दलची राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भिडे वाडा जागेचे मालक विजय ढेरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तिथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या (Chandrakant Patil) आवाहनाला ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरु यांच्याशी चर्चा करुन सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठे हे देखील उपस्थित होते.

 

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर करा.
अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केली होती.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | guardian ministers chandrakant patil discussion with the original owner vijay dhere of the place

 

हे देखील वाचा :

Yavatmal ACB Trap | दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना नगरसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepak Mankar | श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिपक मानकर यांच्या नेतृत्वातील स्वामी समर्थ पॅनल विजयी

Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार यांचे संजय राऊत यांना खडे बोल; म्हणाले…

 

Related Posts