IMPIMP

Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील महिलेचे लपून फोटो काढणे गुप्तहेरांना आले अंगाशी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | एक महिला जाते कोठे, करते काय याविषयी त्यांना चौकशीचे काम मिळाले होते. ते गुप्तपणे काम करत होते. परंतु, त्यांची ही हेरगिरी महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर या महिलेचा पाठलाग करुन फोटो काढणार्‍या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. चौकशीत त्यांची गुप्तहेर एजन्सी असून त्यांच्या ग्राहकासाठी काम करीत असल्याचे समोर आले. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. निलेश लक्ष्मणसिंग परदेशी Nilesh Laxman Singh Pardeshi (वय २५, रा. वडगाव मावळ) आणि राहुल गुणवंतराव बिरादार Rahul Gunwantrao Biradar (वय ३०, रा. देहुगाव, ता. मावळ) अशी त्यांची नावे आहेत. निलेश परदेशी यांची गुप्तहेर संस्था असून बिरादार हे त्यांचे सहायक आहेत. हा प्रकार १ डिसेबर २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime News)

 

याबाबत कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जेथे जात, तेथे त्यांचा कोणीतरी पाठलाग करुन त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून ते कोणाला तरी पाठवत होते. या महिलेला याचा संशय आला. आपले फोटो काढून त्याचा गैरवापर करतील, सोशल मीडिया अथवा इतर घातपाती कृतीसाठी करण्याची शक्यता असल्याचा संशय आला.

 

त्यांनी काही दिवसांपूर्वी भरोसा सेल (Bharosa Cell, Pune) तेथे तक्रार केली.
परंतु, त्यावर काही कारवाई झाली नाही. तेव्हा त्यांनी सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांची भेट घेतली.
पोलिसांनी या महिलेवर कोण पाळत ठेवत आहे, याचा शोध घेणे सुरु केले.
फिर्यादी महिला या कोरेगाव पार्कमधील ऑर्थर्स थिम हॉटेलमध्ये ७ जानेवारी रोजी गेल्या होत्या.
त्यावेळी दोघे जण लपून लांबून त्यांचे फोटो काढत होते.
फिर्यादी यांच्यावर साध्या वेशात नजर ठेवून असलेल्या पोलिसांना त्यांची कृती संशयास्पद दिसल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते एका गुप्तचर संस्थेचे असल्याचे आढळून आले. त्यांना हे काम कोणी दिले याची माहिती ते देत नसून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

 

हे देखील वाचा :

Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

Sarla Ek Koti Trailer | ‘सरला एक कोटी’चा ट्रेलर लॉन्च; संगीताने लावले चार चाँद ! सरला भिकाच्या नशिबाची गोष्ट अन् श्रवणीय गाण्यांची पर्वणी

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts