IMPIMP

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold-Silver Rate Today | gold price today what was feared will happen gold a few rupees below corona era highs know the rates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कोरोना काळात सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate Today) उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold-Silver Rate Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा दर 56 हजार 071 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज भारतीय वायदे बाजारात (Indian Futures Market) सोन्याची किंमत 56 हजारांवर गेली आहे. कोरोना काळाच्या काळात सोन्याचे दर (Gold-Silver Rate Today) 56 हजार 200 रुपयांवर गेले होते. त्या रेकॉर्डपासून सोने केवळ 129 रुपये दूर आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात देखील वाढ होत आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 0.59 टक्क्यांनी वाढाला आहे. तर चांदीचा दर 0.62 टक्क्यांनी वाढला आहे.

 

फ्युचर्स मार्केटमध्ये (Futures Market) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर सकाळी 9.30 पर्यत 328 रुपयांनी वाढून 56 हजार 071 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. आज सोन्याचा दर 55,800 रुपयांवर उघडला. गेल्या ट्रेडिंग सत्रात MCX वर सोन्याचा दर 440 रुपयांनी वाढून 55,730 रुपयांवर बंद झाला होता.

 

MCX वर आज चांदीच्या दरात 4311 रुपयांनी वाढ झाली आहे.
आजचा चांदीचा दर 69,586 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मागील ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 1100 रुपयांनी वाढून 69,178 रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे आणि चांदीचे दर वाढले आहेत.
सोन्याचा दर आज 0.63 टक्क्यांनी वाढून 1,877.59 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
तर चांदीचा भाव 0.62 टक्क्यांनी वाढून 23.98 डॉलर प्रति औंसवर गेला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold price today what was feared will happen gold a few rupees below corona era highs know the rates

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘चिक्या’ भाईला शिव्या दिल्याच्या कारणावरुन दोघा युवकांवर चाकूने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न

Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ

Pune Crime News | पुण्यात उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार

 

Related Posts