IMPIMP

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | ते मुळचे यवतमाळचे, दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी गुपचूप प्रेमविवाह (Love Marriage) केला. ती शिक्षणासाठी पुण्यात राहु लागली. त्याला कायमच तिच्याविषयी संशय होता. त्यातून तो तिला मारहाण (Beating) करीत, तिचा फोन नंबर त्याने ब्लॉक केला. त्यामुळे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समिक्षा माने (वय २२) असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत राहुल देवराव माने (वय ४८, रा. आंबेडकरनगर, यवतमाळ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश कुरेवार (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज येथील संतोषनगरमधील घुंगरुवाले चाळीत ८ जानेवारी रोजी घडला होता. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी समिक्षा माने हिने फिर्यादी यांना काहीही माहिती
न देता अविनाश कुरेवार याच्याबरोबर लग्न केले. त्यानंतर ती मैत्रिणीबरोबर शिक्षणासाठी पुण्यात राहु लागली.
तो यवतमाळला रहात होता. आपण लग्न केल्याचे तिने घरी सांगितले होते. लग्नानंतरही अविनाश याला संशय होता.
समिक्षा दुसर्‍या कुठल्यातरी मुलासोबत बोलते व फिरते असा संशय घेऊन तो तिला वारंवार फोनवरुन शिवीगाळ
करुन मारहाण करीत असे. तिला टॉर्चर करुन तिचा फोन नंबर ब्लॉक केला होता.
त्यामुळे आलेल्या दडपणामुळे समिक्षा माने हिने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास
घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Even after a love marriage, a married woman committed suicide by hanging herself due to suspicion

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘पठाण’चे पोस्टर फाडणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Nagpur Crime | उधारीचे पैसे मागितले म्हणून तरुणावर वार; नागपूरमधील घटना

 

Related Posts