IMPIMP

Pune Crime News | यात्रेत गावगुंडांचा हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना

by nagesh
 Pune Crime News | firing in the air during a yatra in pune maval pimpri crime news

मावळ : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील मावळमधील चांदखेड येथे यात्रेमध्ये गावगुंडाने हवेत गोळीबार (Firing In Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर दिवसा गोळीबार केल्याने यात्रेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना (Pune Crime News) सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दहशत पसरवण्यासाठी हे कृत्य केल्याचे शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या घटनेती आरोपीला पोलिसांनी काही तासात अटक (Arrest) केली. अविनाश गोठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गोठे याच्यासह चार जणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी गोठे याच्यावर यापूर्वी विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रा असल्याने अनेक लोक येथे आले होते. गर्दी फायदा आणि गावात दहशत माजवण्यासाठी आरोपीने दारुच्या नशेत हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat) आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या
(Shirgaon Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ
(Senior Police Inspector Vanita Dhumal) यांनी गोळीबाराची घटना घडल्यानंतर अवघ्या काही
तासात आरोपींना अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime News | firing in the air during a yatra in pune maval pimpri crime news

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्यावर ED च्या छापेमारीबाबत बोलले किरीट सोमय्या; म्हणाले…

Hasan Mushrif ED Raid | ईडीच्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

Maharashtra State Police Sports Competition-2023 | उंच उडी क्रीडा प्रकारात कोकण परिक्षेत्राच्या शितल पिंजारे यांचा नवा विक्रम

 

Related Posts