IMPIMP

Pune Crime News | मांजरी येथे दरोडा; घरात शिरुन कोयत्याने वार करुन लुटले

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | मांजरी (Manjari, Pune) येथील घरात शिरुन पाच चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेऊन दरोडा (Robbery) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी अमर मौला तांबोळी Amar Maula Tamboli (वय ४१, रा. मांजरी रेल्वे स्टेशनजवळ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ५ जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथील गोपाळपट्टी भागात २५ डिसेबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गोकुळ वर्मा हे घरी जेवण करत होते.
त्यावेळी पाच जणांनी घराचा दरवाजा जोरात ढकलून आत प्रवेश केला. त्यांच्यातील एकाने कोयता उगारुन फिर्यादी यांच्या पाठीवर उलटा कोयता मारुन जखमी केले. तसेच दुसर्‍याने गोकुळ वर्मा यांच्या गळ्याला चाकू लावून आवाज करु नका, नाही तर खल्लास करीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. फिर्यादी व त्यांच्या मित्राचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा १४ हजार ६५० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले. या प्रकाराने घाबरुन गेल्याने तांबोळी यांनी कोणालाही याची माहिती दिली नाही. मंगळवारी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Robbery at Cats; They entered the house and robbed it

 

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane | ‘आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर’ नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र; अजित पवारांवरही साधला निशाणा

Maharashtra Politics | ‘अशी विधानं करताना लाज-शरम वाटली पाहिजे’, शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Dhananjay Munde Accident | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

 

Related Posts