IMPIMP

Dhananjay Munde Accident | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

by nagesh
Dhananjay Munde Accident | dhananjay mundes first reaction after the accident the entire sequence of events is told

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात (Dhananjay Munde Accident) झाला आहे. परळीकडे जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात (Dhananjay Munde Accident) झाल्याचे फेसबुक पोस्टमधून त्यांनी सांगितले आहे. तसेच छातीला किरकोळ मार लागला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडं जात असताना हा अपघात झाला. या अपघातात (Dhananjay Munde Accident) ते किरकोळ जखमी झाले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. हा अपघात कसा झाला याबाबत धनंजय मुंडे यांनी माहिती दिली. दरम्यान, धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टममध्ये म्हटले की, मंगळावारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि
भेटी आटपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा
वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.
माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Dhananjay Munde Accident | dhananjay mundes first reaction after the accident the entire sequence of events is told

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पेरणे फाटा येथील बसस्थानकावर पाच जणांचे ११ तोळ्यांचे दागिने लंपास

Mahavitaran Strike | पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणची बत्ती गुल; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडीत

Pune Crime News | खिशात पैसे न मिळाल्याने तरुणाच्या पोटात चाकू खुपसुन केले जखमी; येरवड्यातील गुंजन चौकातील घटना

 

Related Posts