IMPIMP

Maharashtra Politics | ‘अशी विधानं करताना लाज-शरम वाटली पाहिजे’, शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप (Maharashtra Politics) घेतला आहे. तसेच अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ‘ज्यांना जे म्हणायचंय, ते त्यांनी म्हणावं’ असं म्हटलं. त्यामुळे अजित पवार काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाषण केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला होता. छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याची (Hindavi Swarajya) स्थापना केली, असं अजित पवार म्हणाले होते.

 

त्यांना जराही लाज वाटत नाही…

अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण (Maharashtra Politics) तापले असताना संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड शब्दात घणाघात केला आहे. त्यांना जराही लाज वाटत नाही की एवढ्या क्रूरपणे वागणाऱ्या बादशाला ते म्हणतात की तो चांगला होता, क्रूर नव्हता. असं म्हणताना आमच्या दोन थोर राजांचा ते अपमान करत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले.

 

जरा या थोबाडांना आवरा

माझी शरद पवार यांना विनंती आहे की जरा या थोबाडांना तुम्ही आवरा.
कुणी म्हणतंय संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, कुणी म्हणतंय औरंगजेब बादशाह क्रूर नव्हता.
मग संभाजी महाराजांची हत्या कुणाच्या आदेशाने झाली. आपल्या भावाला, बापाला मारणारा कोण होता?
हा क्रूर नाहीये? त्याचा सत्कार केला पाहिजे का? ज्यानं राजाला मारले, तो क्रूर नाहीये? या लोकांना असं
विधान करताना लाज-शरम वाटली पाहिजे, असंही संजय गायकवाड म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | sanjay gaikwad slams ncp targets sharad pawar sambhaji maharaj comment

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde Accident | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Pune Crime News | पेरणे फाटा येथील बसस्थानकावर पाच जणांचे ११ तोळ्यांचे दागिने लंपास

Mahavitaran Strike | पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणची बत्ती गुल; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडीत

 

Related Posts