IMPIMP

Pune Crime | दुर्दैवी ! पुण्यात बुरख्याचा झोपाळा बनवून खेळताना 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

by nagesh
Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  बुरख्याचा झोपाळा बनवून खेळत असताना फास बसून एका आठ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Crime) घडली आहे. सुमैय्या शेख (Sumaiya Sheikh) असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ही घटना ज्यावेळी घडली (Pimpri Crime) त्यावेळी घरात तिचे पालक नव्हते. तसेच इतर तीन बहिणी आपापल्या कामात व्यस्त होत्या. हा प्रकार चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीत घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात शेख कुटुंब राहते. त्यांना चार मुली असून मयत सुमैय्या ही सर्वात लहान होती. रविवारी (दि.29) दुपारी अडीचच्या सुमारास समैय्या दरवाजाच्या हँगरला बुरख्याचा झोपाळा करुन झोका खेळत होती. तेव्हा एक बहीण बेडरुममध्ये, दोन बहिणी हॉलमध्ये त्यांच्या कामात व्यस्त होत्या.

तर सुमैय्याचे आई-वडिल हे घराबाहेर गेले होते. त्याचवेळी सुमैय्याचा बुरख्याच्या झोपळ्यावरुन पाय
निसटला आणि तिला गळफास बसला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. काही वेळाने घरातील लोक आले
असता त्यांना मुलगी लटकल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | pimpri 8 year old girl died while playing

 

हे देखील वाचा :

DICGC | मोठा दिलासा ! संकटात अडकलेल्या बँकांच्या खातेधारकांना मिळतील 5 लाख रुपये, चेक करा कोणत्या तारखेला येतील पैसे?

Pune Crime | खळबळजनक ! पाणीपुरीच्या वादातून पुण्यात पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

Ration Card Rules | आता दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार; रेशन कार्डाच्या नियमांत बदल

 

Related Posts