IMPIMP

Ration Card Rules | आता दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार; रेशन कार्डाच्या नियमांत बदल

by nagesh
Ration Card | if someone else is bringing benefits on ration card then your card will be canceled and charge fine

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Ration Card Rules | नागरिकांना आपल्या हक्काचं धान्य मिळावं यासाठी शासन अनेक योजना राबवते. त्यामध्येच विविध सुविधा देखील दिल्या जातात. रेशन कार्ड (Ration Card Rules) धारकांसाठी (Cardholder) आता दिल्ली सरकारने नियम बदलले आहेत. सरकारने केलेल्या या नियमांचा लाभ सर्व कार्डधारकांना होणार आहे. आणि जे मोफत रेशन दुकानात जाऊन त्यांचे हक्काचे धान्य आणू शकत नाहीत. आता तेही नागरिक रेशन दुकानात न जाता त्यांचे रेशन मिळवू शकणार आहेत. दिल्ली सरकारने (Government of Delhi) केलेल्या नियमात (Ration card rules) नेमकं काय आहे? ते जाणून घ्या.

‘जे लोक वैद्यकीय कारणामुळे अथवा वयामुळे रेशन घेण्यासाठी दुकानात जाऊ शकत नाहीत, ते यासाठी दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करू शकतात. यासह दुसरी व्यक्ती आपल्या रेशन दुकानातून वस्तू आणू शकते. रेशन दुकानातून माल आणण्यासाठी दुकानात बायोमेट्रिकवर बोटांचे ठसे द्यावे लागतात, त्यानंतरच माल उपलब्ध होतो. मात्र, काही लोक काही कारणांमुळे रेशन दुकानात जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही. अशा परिस्थितीत लोकांना या नवीन नियमाचा लाभ मिळणार आहे. अशी नवी नियमावली दिल्ली सरकारने (Government of Delhi) केली आहे.

ज्यांच्या कुटुंबात 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे अथवा 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक असतील आणि ते फिंगरप्रिंटसाठी दुकानात जाऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त त्या कुटुंबांनाही फायदा मिळणार आहे, ज्यांचे सदस्य अपंग आहेत अथवा कोणत्याही रोगामुळे अंथरुणावर आहेत अथवा ई-पीओएस डिव्हाइसमध्ये (E-POS device) समस्या असलेल्या लोकांना याचा लाभ होणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 काय आहे प्रक्रिया?

– या नियमाचा लॅब घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करावे लागणार आहे.

– यानंतर ज्या व्यक्तीला नामांकित केले जाईल, ते त्यांच्या बिहाफमध्ये रेशन आणू शकतात.

– केवळ तेच लोक नामनिर्देशित केले जाऊ शकतात, ज्यांच्याकडे आधीपासून आधार कार्ड आहे आणि त्याच दुकानात आधीच नोंदणीकृत आहेत.

 

नॉमिनी करण्यासाठी…

– कार्डधारकाला (Cardholder) नामांकन फॉर्म भरावा लागेल आणि त्याचे रेशन कार्ड, आधार कार्ड सोबत सादर करावे लागेल.

– या फॉर्मसह नामांकनाची कागदपत्रेही सादर करावी लागतील.

– यानंतर ज्या व्यक्तीला नामनिर्देशित करण्यात आले, ती व्यक्ती दुकानात जाऊन माल खरेदी करू शकते.

 

Web Title : Ration Card Rules | big change in the rules of ration card you will get the grain of your right without going to the shop

 

हे देखील वाचा :

Modi Government | जर घरबसल्या दरमहिना पाहिजेत 5000 रुपये, तर ‘इथं’ करा गुंतवणूक; जाणून घ्या मोदी सरकारची योजना

PhonePe | ‘फोनपे’वर खरेदी करता येईल इन्श्युरन्स पॉलिसी, 30 कोटी लोकांना होईल फायदा; जाणून घ्या

PMRDA | ‘सुस- म्हाळुंगे’ गावातील सार्वजनिक हिताच्या आरक्षणाबाबत विचार केला जाईल – नगरसेवक बाबुराव चांदेरे

Related Posts