IMPIMP

Pune Crime | पुण्यात भंगार व्यवसायिकाला अपहरण करत बेदम मारहाण; पोलिसांनी केलं ‘हे’ काम अन्…

by nagesh
Pune Crime News | two people arrested for extortion by kothrud police pune

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | अपहरण करून भंगार व्यवसायिकाला जबर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक केले आहे. म्हाळुंगे येथील परिसरातून 28 वर्षीय भंगार व्यवसायिकाचं 4 जणांनी अपहरण (Kidnapping) केलं. पैशांची मागणी करत मोटारीतून डोंगराळ परिसरातून फिरवलं. पैसे दे, अन्यथा तुझी बोटं कापू, तुला जीवे मारू अशा धमक्या देत बेदम मारहाण करण्यात आली. या आरोपींना पिंपरीच्या (गुन्हे शाखा) युनिट तीनने (Pimpri Chinchwad Crime Branch) अटक (Pune Crime) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आरोपींनी म्हाळुंगे येथील वासुली फाटा येथून 28 वर्षीय भंगार व्यवसायिकाचे अपहरण (Kidnapping) केले होते.
अगोदर आरोपींनी भंगार व्यवसायिकाला आम्हाला भंगार विकायचे आहे, ते काही अंतरावर असून तुम्ही सोबत या सांगितले.
तो विश्वास ठेवून आरोपींसोबत गेला, मात्र, त्याला मोटारीत बसल्यानंतर तुझी बोटं कापू, तुला जीवे मारू अशा धमक्या देऊन बेदम मारहाण (Pune Crime) करत पैशांची मागणी केली गेली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काही तास व्यवसायिकाला मोटारीतून डोंगराळ परिसरात फिरवलं. त्याच्या बँक खात्यातून, गुगल पेद्वारे 1.5 लाख रुपये काढून घेतले आणि त्याला ठराविक मध्येच सोडून दिलं.
जखमी अवस्थेत व्यवसायिक म्हाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, आरोपी हे आंबेठाण गावातून जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली.
या माहितीनुसार गावात वाहतूक कोंडी करून सापळा रचत आरोपीच्या मुसक्या (Pune Crime) आवळल्या.

दरम्यान, याप्रकरणी सरदार अकबर सय्यद (Sardar Akbar Syed), शरद ज्ञानेश्वर मोरे (Sharad Dnyaneshwar More), रामदास मारुती साळुंखे (Ramdas Maruti Salunkhe),
प्रभू शिवलिंग कोळी (Prabhu shivling koli) या आरोपींना अटक (Arrested) करण्यात आलं आहे.
दरम्यान, आरोपी शरद ज्ञानेश्वर मोरे आणि रामदास मारुती साळुंखे हे दोघे जण काही महिन्यांपूर्वी खुनाच्या प्रकरणातून जेलमधून बाहेर पडले आहेत.
त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती. यामुळे ते भंगारच्या उद्देशाने अपहरण करत पैसे लुटत आहेत .

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : pune crime | pimpri chinchwad crime branch police arrest accused of kidnapping of scrap businessman for money

 

हे देखील वाचा :

Coastal Road Projects | वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम पाडले बंद; आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका

PM Modi meets Pope Francis | तब्बल 22 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांची पोप फ्रान्सिस यांच्याशी बैठक, दिलं भारत भेटीच निमंत्रण

Amravati Crime | फाइलमागे 5 हजार रुपयांची मागणी; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ

 

Related Posts