IMPIMP

Pune Crime | खून करुन केला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | Pretending to commit suicide by strangulation Shocking incident in Katraj area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कात्रज (Katraj) येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ एका लोखंडी पाईपला एका पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचे शुक्रवारी पहाटे आढळून आले. शवविच्छेदनानंतर (Post Mortem) ही आत्महत्या नसून कोणीतरी त्याच्या डोक्यात मारुन ठार केले व त्यानंतर पाईपाला लटकवून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रकाश किसन जाधव Prakash Kisan Jadhav (वय ४२, रा. सुधामातानगर, कात्रज) असे खून झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नंदलाल हरिश्चंद्र भादले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जाधव हे बिगारी काम करीत होते. त्यांना २ मुले, सुना, पत्नी आहेत. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला, त्याच्यासमोरच ते राहतात. शुक्रवारी पहाटे घरासमोरील लोखंडी पाईपला त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनात त्यांचा गळा दाबून तसेच त्यांच्या डोक्यामध्ये अंतर्गत जखमा करुन त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांना दोरीच्या सहाय्याने लोखंडी पाईपाला लटकावून त्यांनी गळफास घेतल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangeeta Yadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pretending to commit suicide by strangulation Shocking incident in Katraj area

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | महाराष्ट्रात पोलीस कर्मचार्‍याचा अर्ज पाहून वरिष्ठ अधिकारी चक्रावले, मॅरेज अ‍ॅन्व्हर्सरीला म्हटले पश्चाताप दिवस

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार प्रभाकर साईलचा 37 व्या वर्षी मृत्यु; समीर वानखेडेंवर केला होता आरोप; जाणून घ्या काय झालं

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट

 

Related Posts