IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार श्रीनाथ उर्फ शेरु परदेशी व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 90 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीत दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार श्रीनाथ उर्फ शेरु विलास परदेशी (Srinath alias Sheru Vilas Pardeshi) आणि त्याच्या 5 साथिदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का MCOCA Action) Mokka कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिले आहेत. आयुक्तांनी आजपर्यंत 90 आणि चालु वर्षात 27 टोळ्यांवर मोक्का (Pune Crime) कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टोळी प्रमुख श्रीनाथ उर्फ शेरु परदेशी (वय-37) रणजित विलास परदेशी (वय-42), चिराग महेश जोशी (वय-20 रा. शिवाजीनगर गावठाण, शिवाजीनगर, पुणे), अथर्व उर्फ पांडा अभय देशपांडे (वय-27 रा. जांभुळवाडी, कात्रज), प्रविण उर्फ आऊ प्रकाश शेळके (वय-32), सलमान मोहम्मद शफी शेख (वय-28 दोघे रा. ज्ञानेश्वर पातुका चौक, मॉडर्न कॉलनी, शिवाजीनगर) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपी हे बाबा बोडके (Baba Bodke) याच्या टोळीतील सदस्य आहेत. आरोपींनी जंगली महाराज रस्त्यावरील (Jungle Maharaj Road) एका मोबाइल शॉपी चालकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी (Extortion) मागितली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी मोबाइल शॉपी चालकाकडून 6 लाखांसाठी 35 लाख रुपये व्याज उकळले होते.

 

या टोळीने स्वत:चे तसेच टोळीच्या वर्चस्वासाठी खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), बलात्कार (Rape), अपहरण (Kidnapping), जबरदस्तीने खंडणी मागणे, दहशत माजवणे, विना परवाना शस्त्र बाळगणे, मारामारी यासारखे गुन्हे (Pune Crime) केले आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.

 

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane)
यांनी पोलीस उपायुक्त परीमंडळ 1 डॉ. प्रियांका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranware)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने (Vishrambagh Division ACP Ramakant Mane) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परीमंडळ 1 डॉ. प्रियांका नारनवरे,
विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने,
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud), पोलीस अंमलदार गणपत वाळकोळी,
राहुल होळकर, दिलीप नागरे, तुकाराम म्हस्के, रोहित झांबरे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 90th MCOCA action till date against Pune-based Criminals; Srinath alias Sheru Pardeshi and his gang booked under mokka

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यात गुंडांकडून चारचाकी, मोटारसायकल, टेम्पोच्या काचा फोडून दहशत

Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार

 

Related Posts