IMPIMP

Pune Crime | सराईत वाहन चोराला गुन्हे शाखेकडून अटक, 21 गुन्हे उघड

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पुणे शहर आणि जिल्ह्यात वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 21 गुन्हे उघडकीस आले असून 6 लाख 17
हजार रुपये किमतीच्या 20 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी असा मुद्देमाल (Pune Crime) जप्त केला आहे.

 

सुरेश संभाजी वाघमारे (वय-28 रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व दत्तात्रय खरपुडे यांना सुरेश वाघमारे याने दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला मांजरी येथे अटक करुन सखोल चौकशी केली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चौकशी दरम्यान आरोपीने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील -5, लोणी काळभोर आणि यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील – प्रत्येकी 2, विमाननगर, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून 20 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. आरोपीने त्याचा साथीदार बालाजी वाघमारे (रा. सोलापूर) याच्या मदतीने वाहने चोरली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर,
पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे,
गणेश लोखंडे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal

 

हे देखील वाचा :

MP Vinayak Raut | खा. प्रतापराव जाधवांच्या गौप्यस्फोटाला खा. विनायक राऊतांचा पलटवार; म्हणाले,”ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळीकडे पिवळे दिसते, त्याच पद्धतीने…”

Maharashtra Government Recruitment | 75 हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचे संबंधित विभागांना नवे आदेश, परीक्षेसंबंधीच्या अटीशर्ती जाहीर

Actor Singer Utkarsha Shinde | मराठी कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्त होणं गरजेचं; उत्कर्ष शिंदेची रोखठोक भूमिका

 

Related Posts