IMPIMP

Maharashtra Government Recruitment | 75 हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचे संबंधित विभागांना नवे आदेश, परीक्षेसंबंधीच्या अटीशर्ती जाहीर

by nagesh
Maharashtra Government Recruitment | order general administration department start recruitment process for posts outside mpsc

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Government Recruitment | महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) लवकरच सुमारे ७५ हजार पदांची भरती करणार आहे. त्या संबंधीचे आदेश सरकारने आधीच काढले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील (MPSC) जागा भरण्यासाठी सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट 2023 या वर्षात पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विभाग स्तरावर कार्यक्रम आखण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने अन्य विभागांना दिले. निवड प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम विभागांनी दरवर्षी राबवणे अपेक्षित आहे. (Maharashtra Government Recruitment)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पदांची भरती प्रक्रिया टीसीएस- आयओएन, आयबीपीएस (TCS TCA ION) या कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यासाठीच्या अटी-शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील ही पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा या कंपन्यां घेतील. सामान्य प्रशासन विभागाने परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, परीक्षा केंद्रावरील सुविधा बाबतच्या अटी-शर्तींचा शासन निर्णय सोमवारी प्रसिद्ध केला. निवडलेल्या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड शासनाच्या विभागांना करता येईल. प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी विभागांनी कंपन्यांच्या दरामध्ये पंधरा टक्के आणि कर सरसकट समाविष्ट करून परीक्षा शुल्क निश्चित करायचे आहे. परीक्षा शुल्कात राखीव गटासाठी १५ टक्के सवलत दिली जाईल, परीक्षा शुल्क ऑनलाइन स्वीकारले जाईल, परीक्षा शुल्काच्या रकमेतून खर्च भागवून रक्कम बाकी राहिल्यास ती शासनाच्या एकत्रित निधीमध्ये जमा केली जय. तसेच, अर्थसंकल्पात अतिरिक्त प्रशासकीय खर्चासाठी तरतूद करण्यास विभागांना मान्यता देण्यात आली आहे. (Maharashtra Government Recruitment)

शासनाच्या विभागांना पद भरतीसाठी कंपनीबरोबर सामंजस्य करार करावा लागेल.
परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी उमेदवारांकडून परीक्षेचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे, परीक्षा शुल्क ऑनलाइन स्वीकारणे, ऑनलाइन प्रवेशपत्र तयार करणे, परीक्षेचा निकाल तयार करणे, शिफारसपात्र नसलेल्या उमेदवारांची यादी करणे, इत्यादी बाबींचा सामंजस्य करारात समावेश करावा लागेल. तसेच परीक्षा पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही प्रणाली, मोबाइल जॅमर, बायोमेट्रिक उपस्थिती, आयरिस स्कॅन, फ्रिस्किंग आदी सुविधांचा सामंजस्य करारात उल्लेख करावा लागेल. शिवाय, प्रत्येक परीक्षा केंद्रावर संबंधित विभागाचा प्रतिनिधी नेमावा लागेल, असे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Government Recruitment | order general administration department start recruitment process for posts outside mpsc

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde Group | शिवसेनेचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात जाणार?

Actor Singer Utkarsha Shinde | मराठी कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्त होणं गरजेचं; उत्कर्ष शिंदेची रोखठोक भूमिका

Pune Rickshaw Strike | बाईक टॅक्सी सेवेविरोधात पुण्यात रिक्षाचालक करणार बेमुदत बंद; ‘बघतोय रिक्षावाला संघटने’च्या आवाहनाला इतर रिक्षा संघटनांचा पाठिंबा

Pune Crime | सेक्स्टॉर्शनमध्ये राजस्थानचे एक संपूर्ण गाव सहभागी; पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येमुळे खुलासा

 

Related Posts