IMPIMP

Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सेंट्रल बिल्डिंग (Central Building) समोरील जुन्या पडीक घरामध्ये दरोड्याच्या (Robbery) तयारी असलेल्या व पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुंडाच्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकाने गजाआड (Pune Crime) केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मयुर राठोड Mayur Rathod (वय 21, रा. गणेशनगर, येरवडा), सुरेश बापू सकट Suresh Bapu Sakat (वय 19, रा. पुणे स्टेशन दग्याजवळ), सरफराज मेहबूब मकानदार Sarfaraz Mehboob Makandar (वय 29, रा. शिवाजीनगर, बेळगाव, कर्नाटक), सुरेश बाबुदास वैष्णव Suresh Babudas Vaishnav (वय 26, रा. कामटेवस्ती, हडपसर) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या साथीदार दीपक ऊर्फ दिप्या रमेश कांबळे Deepak alias Deepya Ramesh Kamble (रा. देहुरोड) हा पळून गेला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकातील पोलीस अंमलदार कादीर शेख (Kadar Sheikh) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार नेवसे, प्रमोद कोकणे, पटेल, सोनुने हे खाजगी गाडीतून गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सेंट्रल बिल्डिंगसमोरील जुन्या पडक्या घरामध्ये 4 ते 5 गुंड हत्यारासह दबा धरुन बसले असून ते येणार्‍या जाणार्‍या पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत आहेत. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीसा पथक तेथे गेले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे अस्तित्व लपवून थांबले.

 

रात्री दहा वाजता त्यांना जुन्या पडक्या घरामध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण दिसत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एकमेकांना इशारा करुन अंधारात बसलेल्या चौघांना ताब्यात घेतले. या गडबडीत एक जण पळून गेला. त्यांच्या अंगझडतीत लोखंडी रॉड, कोयता, मिरची पावडर अशा वस्तू मिळून आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणे स्टेशनकडून (Pune Station) कॅम्पकडे जाणार्‍या येणार्‍या पादचारी लोकांना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याकरीता ही शस्त्रे बाळगल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, मोहसीन शेख, गजानन सोनुने, पटेल, राख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests gang of criminals preparing to commit robbery

 

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर

Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच संध्याकाळी होणार

 

Related Posts