IMPIMP

Pune Crime | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून खडकी परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 9 जण ताब्यात

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell raids gambling den in Khadki area, arrests 9

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीत सुरु असलेल्या कल्याण मटका (Kalyan Matka) जुगार व पंती पाकोळी सोरट (Panti Pakoli Sorat) जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकला. ही कारवाई सोमवारी (दि.18) रेंज हिल्स (Range Hills Pune) झोपडपट्टी जवळील रेल्वे पटरी जवळ करण्यात आली. याप्रकरणी 9 आरोपींवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात (Pune Crime) घेण्यात आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रेंज हिल्स झोपडपट्टी जवळील रेल्वे पटरी जवळ कल्याण मटका जुगार खेळत असल्याची व पंती पाकोळी सोरट जुगार घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून विश्वनाथ अमिनाप्पा भोई (वय-43 रा. सुदर्शन नगर, चिंचवड), धनंजय मारुती चव्हाण (वय-54 रा. सुखसागर नगर, अप्पर), नवनाथ सोपान मात्रे (वय-39 रा. दर्गा वसाहत, खडकी), राजु लिंगप्पा पिल्ले (वय-52 रा. बोपोडी, पुणे), सौरभ संदीप पवार (वय-22 रा. पडाळ वस्ती, औंध), राजु सिताराम पवार (वय-50 रा. नडे नगर, काळेवाडी), राजु गणा काळे (वय-40 रा. खडकी), नितीन शिवराज बागवे (वय-29 रा. विजयन नगर, सांगवी), चिंदानंद गंगाराम वाघमारे (वय-50 रा. डि.पी.रोड, औंध) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 11 हजार 700 रुपये रोख, 22 हजार 500 रुपयांचे मोबाइल, 400 रुपयांचा टेबल असा एकूण 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime)

 

 

या गुन्ह्यातील आरोपी जॉन नायर हा फरार झाला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी 9 आरोपींना खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे
(Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक
सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, आण्णा माने, हनमंत कांबळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell raids gambling den in Khadki area, arrests 9

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चारचाकी गाड्यांचे सायलेंन्सर चोरणार्‍यांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, 3.70 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले

 

Related Posts