IMPIMP

Pune Crime | चारचाकी गाड्यांचे सायलेंन्सर चोरणार्‍यांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, 3.70 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Police arrest four-wheeler silencer thieves, seize Rs 3.70 lakh worth of valuables

लोणी काळभोर : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लोणी काळभोर (Lonikalabhor) आणि परिसरातून चारचाकी गाड्यांचे (Four-
Wheeler) सायलेंन्सर चोरणाऱ्या (Silencer Thieves) दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) सापळा रचून अटक (Arrest)
केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी (Pune Police) मारुती सुझुकी ईको गाडीचे चोरलेले सायलेन्सरसह 3 लाख 70 हजार 100
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.16) उरळी देवाची (Uruli Devachi) येथे करण्यात आली असून शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (Shivprasad Pandharinath Rokade), राम राजेश ढोले (Ram Rajesh Dhole) या दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान तपास पथकातील (Investigation Team) पोलीस अंमलदार संभाजी देविकर (Sambhaji Devikar) यांना माहिती मिळाली की, सायलेन्सर चोरणारे चोरटे उरुळी देवाची गावच्या हद्दीत येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून शिवप्रसाद रोकडे (वय-21 रा. गोपाळपुरा, आळंदी-Alandi, ता. खेड) आणि राम ढोले (वय-20 रा. आळंदी ता. खेड) यांना ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

 

पोलिसांनी आरोपींकडे असलेल्या स्विफ्ट कार व चोरलेले 14 सायलेन्सर, सायलेन्सरचे कनव्हर्टर मधील धातुमिश्रीत चुरा असा एकूण 3 लाख 70 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक महेश भोंगळे (Police Naik Mahesh Bhongale) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor)
पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक सुनिल नागलोत,
श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, महेश भोंगळे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे, बाजीराव विर,
शैलेश कुदळे, निखील पवार, दिगंबर साळुंखे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Police arrest four-wheeler silencer thieves, seize Rs 3.70 lakh worth of valuables

 

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले

Tata IPL 2022 | आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर ! आता आयपीएल रद्द होणार नाही, कारण…

 

Related Posts