IMPIMP

Pune Crime | मोबाईल दुकानावर दरोड्याच्या तयारीतील टोळके जेरबंद ; तडीपार गुन्हेगारासह मोबाईल चोरी करणार्‍या पाच जणांना अटक

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | फुरसुंगी (Fursungi) येथील मोबाईल दुकानावर (Mobile Shops In Pune) दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या (Pune Criminals) टोळक्याला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट ५ च्या पथकाने जेरबंद केले आहे. यामध्ये एका तडीपार गुंडाचा समावेश आहे. हडपसर पोलीसांनी (Hadapsar Police Station) शिवराज ऊर्फ सुरज अर्जुन वाडेकर (Shivraj alias Suraj Arjun Wadekar), संतोष राजू गायकवाड (Santosh Raju Gaikwad), दत्ता गणेश गायकवाड (Datta Ganesh Gaikwad), अविनाश ऊर्फ चार्ली सिद्राम जाधव (Avinash alias Charlie Sidram Jadhav), लखन सुभाष जाधव (Lakhan Subhash Jadhav) यांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत शिवराज ऊर्फ सुरज अर्जुन वाडेकर (वय २४), संतोष राजू गायकवाड (वय २६), दत्ता गणेश गायकवाड, अविनाश ऊर्फ चार्ली सिद्राम जाधव (वय २९), लखन सुभाष जाधव (वय ३०, सर्व रा. मुंढवा) यांचा विरूध्द पोलीस हवालदार अजय गायकवाड (Ajay Gaikwad) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात Hadapsar Police Station (गु. रजि़ नं. ४५८/२२) फिर्याद दिली असून, ही टोळी प्रामुख्याने बसमधील महिलांना हेरुन त्यांच्या पर्समधील तसेच अंगावरील दागिने लांबवीत असत. तसेच रस्त्यावरुन जाणार्‍यांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेत असत. या टोळीतील अविनाश जाधव हा सराईत चोरटा असून त्याला तडीपार करण्यात आले होते. या टोळीला अशाच प्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ऑक्टोबर २०२१ मध्ये पकडण्यात आले होते. जामिनावर सुटल्यानंतर ते पुन्हा चोर्‍या करु लागले. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना
त्यांना पुणे- सासवड रोडवरील (Pune-Saswad Road) फुरसुंगी ओव्हर ब्रीज खाली काही जण जमले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोयते, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, मिरची पावडर,
नायलॉन दोरी व इतर साहित्य आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले.
तेथून काही अंतरावर असलेल्या जगदंब मोबाईल शॉपीचे हे दुकान बंद होण्याअगोदर दुकानात घुसून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलीस हवालदार अजय गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (गु. रजि़ नं. ४५८/२२) फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक लोणारे (API Lonare) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Unit 5 Arrest Criminals In Hadapsar Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या आजचे दर

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ajit Pawar | ‘साहेबांसमोर सांगतो, मला विक्रम काळेची भीतीच वाटते’, असं का म्हणाले अजित पवार

 

Related Posts