IMPIMP

Pune Crime | खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणांना मारहाण ! खडकवासलामध्ये भर रस्त्यात कोयते फिरवून दहशत माजवणारी टोळी गजाआड

by nagesh
Pune Crime | Two arrested in Ashti for Painter Murder Case Manjri Pune Police Crime News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) खडकवासला (Khadakwasla) गावातील मंडईतून कोयते फिरवून दहशत माजवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला (Criminals Gang Pune) हवेली पोलिसांनी (Haveli Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. तर अल्पवयीन मुलाला समजपत्र देऊन सोडून देण्यात आले आहे. हा प्रकार 16 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला होता. हवेली पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) डोणजे फाट्याजवळील (Donje Phata) एका हॉटेलच्या परिसरात केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गौरव राकेश चव्हाण (वय – 21), परशुराम चिलाप्पा सोनकांबळे (वय – 21), विशाल सिद्धु बनसोडे (वय – 23) सौरभ कोंडीबा कांबळे (वय – 20 सर्व रा. लमाणवस्ती, खडकवासला), गणेश अशोक शेळके (वय – 28 रा. तळजाई वसाहत, मुळ रा. डोणजे), विलास कोंडीबा मरगळे (वय – 20 रा. आडमाळ ता. मुळशी – Taluka Mulshi) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास काही तरुणांनी हातात कोयते व काठ्या घेऊन खडकवासला गावातील काही तरुणांना मारहाण (Beating) केली.
तसेच मंडई परिसरात कोयते फिरवत व दमदाटी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत शनिवारी (दि. 19) हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार निलेश राणे (Police constables Nilesh Rane)
व विलास प्रधान (Vilas Pradhan) यांना माहिती मिळाली की,
फरार आरोपी डोणजे फाट्याजवळील एका हॉटेलच्या परिसरात लपून बसले आहेत.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम (API Nitin Nam), पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नांदे (PSI Pradeep Nande), पोलीस हवालदार निलेश राणे, विलास प्रधान व पोलीस नाईक दिपक गायकवाड यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम करीत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला येथील तरुणांमध्ये एकमेकांकडे खुन्नसने बघण्यातून बाचाबाची झाली होती.
याचे रुपांतर हाणामारीत झाले यानंतर दुसऱ्या टोळीने रात्री पुन्हा खडकवासला गावात येऊन कोयते व काठ्या घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune rural police haveli police arrested those who created an atmosphere of terror in khadakwasla

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी तेजीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

Kashmiri Pandits | काश्मिरी पंडितांना 7 वर्षात मिळाली 17 % घर; केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आकडेवारी

Narayan Rane | बंगल्यावरील ‘हातोड्या’ची कारवाई टाळण्यासाठी नारायण राणेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

 

Related Posts