IMPIMP

Pune Crime | नांदेड सिटी येथील मसाज सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई; परदेशी तरुणीसह तिघींची सुटका

by nagesh
Pune Crime | Pune Rural Police special team action on massage center in Nanded City; The release of the three including the foreign girl

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सिंहगड रोड (Sinhagad Road, Pune) परिसरातील नांदेड सिटी (Nanded City, Pune)
डेस्टीनेशन सेंटर मॉलमधील ब्लु बेरी स्पा (Blueberry Spa Nanded City) मसाज सेंटरवर पुणे ग्रामीण (Pune Rural Police) पोलीसांचे पथकाने
छापा टाकून वेश्या व्यवसाय (Prostitute Racket) करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली. मसाज सेंटर मालक व व्यवस्थापक
असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान
(Police Inspector Vijaysinh Chauhan) यांनी दिली. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहा. उपनिरीक्षक जितेंद्र शेवाळे, महेश गायकवाड, महिला पोलीस हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांचे पथक नेमून त्यांना अवैध वेश्याव्यवसाय धंदयाची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. (Pune Crime)

 

२ सप्टेंबर २०२२ रोजी हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथक सिंहगड रोड नांदेड सिटी मेन गेट येथे येवून गोपनीय माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले यांना नांदेड सिटी येथील डेस्टीनेशन सेंटर मॉलच्या पहिला मजल्यावरील शॉप नं. एफ-६४ या ठिकाणी ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली परदेशी तरुणीकडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे खात्री करणेसाठी पोलीस पथकाने मसाज सेंटरवरील रेडचे नियोजन करुन त्या ठिकाणी बनावट गि-हाईक पाठविला. तेथे मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हीसचे नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दुपारी ०३.०० वा. चे सुमारास छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दोघे मॅनेजर तसेच एक परदेशी व दोन स्थानिक पिडीत तरुणी मिळून आल्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मसाज सेंटरचे मालक १) मुंजा रामदास शिंदे (वय ३१, रा. वडगाव ता. हवेली जि. पुणे) २) योगेश पवार (रा.नांदेड गाव ता. हवेली जि. पुणे) व मॅनेजर ३) अथर्व प्रशांत उभे (वय १९, रा. धायरी, बेनकरवस्ती ता. हवेली, जि. पुणे) व महिला मॅनेजर नामे ४) ज्योती विपुल वाळींबे (वय ३०, रा. न-हे, ता. हवेली, जि. पुणे) हे सदर पिडीत तरुणींना जादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन मसाज सेंटर स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झालेने त्या चौघांचेविरुध्द हवेली पोलीस स्टेशनला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

मसाज सेंटर येथे मिळून आलेल्या पिडीत ३ तरुणींना महिला सुधार गृह येथे पाठविण्यात आलेले आहे. तेथे छाप्याचे वेळी मिळून आलेले मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे, मॅनेजर अथर्व प्रशांत उभे व ज्योती विपुल वाळींबे यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून मुख्य आरोपी योगेश पवार याचा शोध चालू आहे. अटक आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेणेकामी त्यांना मे. कोर्टात हजर करण्यात येत आहे. पिडीत परदेशी तरुणी ही मलेशिया येथून आल्याची माहिती समोर आलेली असून या क्षेत्रात बऱ्याचदा मलेशियन तरुणींची संख्या जास्त असल्याचे दिसून येते.

 

सदरची कारवाई ही पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान,
पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहा. उपनिरीक्षक जितेंद्र शेवाळे, महेश गायकवाड,
महिला हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांचे पथकाने केलेली आहे.

 

पुणे ग्रामीण जिल्ह्यात अशा प्रकारचे वेश्या व्यवसाय व इतर अवैध धंदयावर कडक कारवाई
करणेबाबत पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आदेश दिलेले आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Rural Police special team action on massage center in Nanded City; The release of the three including the foreign girl

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | CM एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान; म्हणाले – ‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’

Shivsena Ambadas Danve On Eknath Shinde Group | दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले – ‘…म्हणून मैदानही तेच राहणार’

Devendra Fadnavis On HM Amit Shah Mumbai Visit | HM शाहांच्या दौर्‍याबाबत फडणवीसांची महत्वाची माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

 

Related Posts