IMPIMP

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Viman Nagar Police Recover 5 Pistols and 14 cartidges from pune criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यात पिस्तुलाची (Pistol) विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी (Pune Viman Nagar Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 5 पिस्टल आणि 14 काडतुसे (Cartridges) असा एकूण 2 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शस्त्र विक्रीच्या गुन्ह्यात अटक (Arrest) करण्यात (Pune Crime) आली होती.

 

राहुल गोपाळ गवळी Rahul Gopal Gawli (वय – 35 रा. बारीवाडा, ता. चोपडा, जि. जळगाव) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी विरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) व महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि.31) फॉरेस्ट पार्क रोडवर (Forest Park Road) केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस नाईक सचिन जाधव (Police Naik Sachin Jadhav) व प्रदिप मोटे (Pradeep Mote) यांना माहिती मिळाली, फॉरेस्ट पार्क रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाखाली एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आणि काडतुसे आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 5 पिस्टल आणि 14 काडतुसे आढळून आली. त्याने पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (Yerawada Division ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप ( Police Inspector Mangesh Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware), पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, प्रदिप मोटे, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, संजय असवले यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : –  Pune Crime | Pune Viman Nagar Police Recover 5 Pistols and 14 cartidges from pune criminal

 

हे देखील वाचा :

BJP PM Candidate 2024 | नरेंद्र मोदीच असणार भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटले

EPFO | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! ईपीएफओने सुरू केली नवीन सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सर्वाधिक लाभ

Stock Market Holidays | ‘या’ महिन्यात NSE, BSE किती दिवस बंद राहणार, चेक करा पूर्ण लिस्ट

 

Related Posts