IMPIMP

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीला लोणावळा, वडकी, भेकराईनगर येथील लॉजवर फिरवलं, केला बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे ‘गोत्यात’

by nagesh
Hyderabad Gang Rape Case | aimim mlas minor son involved in Hyderabad gang rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली असताना गोळ्या देऊन तिचा गर्भपात करणार्‍या डॉक्टरासह दोघांवर लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आशिष शैलेश सपकाळ Aashish Shailesh Sapkal (वय ३४, रा. लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार Dr. Datta Khairnar (रा. धन्वंतरी हॉस्पिटल, धानोरी -Dhanwantari Hospital, Dhanori) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मांजरी (Manjari)येथील २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान घडला होता. फिर्यादी आणि आरोपी सपकाळ हे ओळखीचे आहेत. सपकाळ याने आपले लग्न झाले असल्याचे लपवून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केले. तसेच लोणावळा (Lonavala), वडकी (Wadki), भेकराईनगर येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून त्यांना पावणे दोन महिन्यांच्या गरोदर राहिल्या असताना त्यांना गोळ्या देऊन डॉक्टरकडून गर्भपात (Abortion) करविला. तसेच फिर्यादी यांच्या सोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ, फोटो फिर्यादीच्या परवानगीशिवाय काढले. फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादीने तक्रार दिली असून ही फिर्याद वानवडी पोलिसांकडे (wanwadi police) वर्ग करण्यात आली आहे.

 

Web Title : Pune Crime | rape on 25 years old girl, aashish shailesh sapkal and dr datta khairnar booked

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन दुकानात वीज, पाण्याची बिले भरता येणार; PAN, पासपोर्टच्या अर्जाचीही सुविधा

Pune News | राज्यातील नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संप

Vidyadhar Karmarkar | ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’.. विद्याधर करमरकर यांचे निधन

 

Related Posts