IMPIMP

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार तडीपार आरोपीला समर्थ पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Samarth police arrest Criminal who abscond in attempt to murder case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार (Tadipar) करण्यात आले असताना तडीपारीच्या आदेशाचा
भंग करुन शहरात वावरणाऱ्या आणि खुनाचा प्रयत्नाच्या (Attempt To Murder) गुन्ह्यात फरार (Pune Crime) असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी
(Samarth Police Station) अटक केली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ही
कारवाई मंगळवार पेठेत करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

रोहण्या उर्फ रोहन अशोक गायकवाड Rohanya alias Rohan Ashok Gaikwad (वय-25 रा. कलवडी वस्ती, फलके वस्ती, लोहगाव-Lohgaon, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विमाननगर पोलीस ठाण्यात (Vimannagar Police Station) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्तांनी (DCP) दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून (Pune District) तडीपार केले होते. आरोपीने पुणे शहरात (Pune Crime) येण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

 

समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे (Investigation Team) अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घातल असताना पोलीस अंमलदार शाम सुर्यवंशी (Sham Suryavanshi) यांना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणारा आणि तडीपार आरोपी मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथील रोडवर उभा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सहा महिन्यापूर्वी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केल्याची कबूली दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ . प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranvare),
सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर (ACP Satish Govekar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam)
यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे (API Sandeep Jore), पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सतिश भालेराव, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Samarth police arrest Criminal who abscond in attempt to murder case

 

हे देखील वाचा :

PM Kisan Scheme | येथे 1 लाखापेक्षा जास्त लोक घेऊ शकत नाहीत किसान योजनेचा लाभ, तुमच्या बाबतीत सुद्धा असे घडले नाही ना ?

Bold Actress Priya Banerjee | एकता कपूरच्या ‘बेकाबू’ वेबसिरिजमधील प्रिया बॅनर्जी आहे तरी कोण ? चक्क सनी लिओनीच्या बोल्डनेसला देते टक्कर

Urfi Javed Traditional Look Video | उर्फी जावेदला अशा कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले – ‘अरे हे काय बघितलं…’

 

Related Posts