IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कपडे व्यावसायिकाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न, एकावर FIR

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील एका कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जीवंत
जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Burn Alive) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 7) पहाटेच्या
सुमारास धनकवडी (Dhankawadi) येथील स्मशानभूमी आवारात घडला आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) एका विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुरज विजय मरळ Suraj Vijay Maral (वय – 28 रा. जिवनधारानगर, धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोविंदा उर्फ सत्येंद्र यादव Govinda alias Satyendra Yadav (रा. गुजरवाडी, मांगडेवाडी, कात्रज – Katraj) याच्याविरुद्ध भादवी कलम 307,504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज मरळ आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. आरोपी सध्या गुजरवाडी (Gujarwadi) येथे राहण्यास गेला आहे. फिर्यादी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय (Clothes Selling Business) असून ते घरातून हा व्यवसाय करतात. रविवारी (दि.6) ते व्यवसायातील पैसे गोळा करत असताना रात्री दहाच्या सुमारास आरोपी त्यांना भेटला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यानंतर दोघांनी एका ठिकाणी दारु पिली. त्यानंतर धनकवडी स्मशानभुमी या ठिकाणी जाऊन गप्पा मारत बसले होते.
दारूच्या नशेत आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली.
तसेच जवळ पडलेला सिमेंटचा ब्लॉक (Cement Block) डोक्यात मारुन जखमी केले.
सुरज यांनी त्यांच्या वडिलांच्या गाडीत भरण्यासाठी आणलेले पेट्रोल आरोपीने त्यांच्या अंगावर ओतून पेटवून देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे (API Umesh Londhe) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking Attempt to burn a Pune garment trader alive by throwing petrol FIR on one

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | पैठण – औरंगाबाद रोडवर महिलेचा खून, प्रचंड खळबळ

Pune Metro | मेट्रोतून सायकल घेऊन प्रवास करण्यास महामेट्रोची मान्यता

Pune NCP | PM मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मेघडंबरीचा छोटा ‘कोपरा’ अपघाताने कोसळला, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन

 

Related Posts